पोटाची खळगी भरण्यासाठी चित्रपटात मार खायचा हा सुपरस्टार, एकेकाळी वॉचमॅनची नोकरी करणारा आज कोट्याधीश

Birthday Special : बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी आज तो एक आहे. पण ऐककाळी पोटाची खळगी भरण्यासाठी वॉचमॅनच काम आणि चित्रपटात मार खायचा काम करायचा हा सुपरस्टार. आज या अभिनेत्याची संपत्ती ऐकून तुम्ही हैराण व्हाल. 

May 19, 2024, 08:43 AM IST
1/8

सिनेसृष्टीशी तुमचं काही नातं नसेल तर इथे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणि आपलं स्थान निर्माण करण्यासाठी असंख्य संघर्षातून कलाकाराला जावं लागतं. या फोटोमधील अभिनेत्याने आज या उंचीवर पोहोचण्यााठी अनेक अडथळे पार केले आहेत. 

2/8

उत्तर प्रदेशातील बुढाणा या छोट्याशा शहरातील बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा आज 50 वा वाढदिवस आहे. त्याच्या अभिनयाने त्याने चाहत्यांच्या हृदयावर आपली छाप सोडली आहे. 

3/8

बॉलिवूडमध्येच आपण काही करु शकतो हे त्याला खूप पूर्वीच लक्षात आलं होतं. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, चित्रपटात येण्यापूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी याने चार वर्ष नाटकात अभिनय केला. 

4/8

त्याला मुझफ्फरनगरच्या घरातून बाहेर पडायचं होत. त्यासाठी त्याने पहिले दिल्लीनंतर मुंबई गाठलं. दिल्लीतील थिएटरमध्ये पैसे नाहीत हे त्याचा लक्षात आलं आणि तो टेलिव्हिजनकडे वळला. मुंबईत त्याच्यावर उपाशी मरण्याची वेळ आली होती. 

5/8

8 भावंडांसोबत गरिबीत बालपण गेलं. त्यामुळे त्याला आता काहीतरी करु दाखवायचं होतं. मुंबईत गोरेगावात चार मित्रांसोबत राहत होता. वॉचमॅन कामही करावं लागलं पण त्याने हार मानली नाही. 

6/8

अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर त्याला आमिर खानचा सरफरोशमध्ये खलनायकाची छोटीशी भूमिका मिळाली. त्यानंतर शूल, जंगल यात त्याने काम केलं. 8 वर्ष जगण्यासाठी छोटे रोल करत राहिला. त्यानंतर 2007 मधील ब्लॅक फ्रायडे अगदी छोटी भूमिका...पण त्यानंतरचा 2012 मधील गँग्स ऑफ वासेपूरने त्याच आयुष्य बदललं. 

7/8

नवाजुद्दीन सिद्दीकीचं दोन लग्न झाली आहेत. पहिलं लग्न 2007 मध्ये संपुष्टात आल्यानंतर त्याने 2010 मध्ये आलियासोबत लग्न केलं. त्याला शोरा आणि यानी अशी दोन मुलं आहेत. 

8/8

मीडिया रिपोर्टनुसार नवाजुद्दीन सिद्दीकीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर आज तो एका चित्रपटासाठी 10-12 कोटी रुपये घेतो. तर जाहिरातून 1-2 कोटी आणि याशिवाय सोशल मीडियावरुही तो कमाई करतो. आज त्याची जवळपास 120 कोटींची संपत्ती आहे.