Happy Mother's Day 2024 : आईच्या फोटोचे Reel शेअर करायचंय? पण गाण कुठलं लावावं समजत नाहीत? मग 'ही' गाणी...

Happy Mother's Day 2024 : मातृदिन म्हणजे मदर्स डे, हा प्रत्येक आई आणि मुलांसाठी खूप खास असतो. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. मग आईसोबतचे फोटो शेअर करुन तिला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या जातात. लहानपणापासून आईसोबतचे छान छान फोटो एकत्र करुन त्याचा एक Reel तयार करण्याचा तुम्ही पण विचार करत आहात. पण त्यावर कुठलं गाणं लावायचं सुचत नाही आहे. मग ही गाणे तुम्हाला नक्कीच आठवडतील. 

May 12, 2024, 10:40 AM IST
1/9

नीरजा चित्रपटातील 'ऐसे क्यूं मां' मधील सर्व आयांसाठी हे एक सुंदर गाणं आहे. ज्यामध्ये एक मूल आईकडे तक्रार करते. या चित्रपटात सोनम कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे.   

2/9

शाहिद कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या 'फाटा पोस्टर निखला हिरो' या चित्रपटातील 'जनम जन्म जो बेटा' हे गाणे आपल्या आईवरील मुलाचे प्रेम शब्दात उत्तम प्रकारे टिपलंय.

3/9

तारे जमीन पर या चित्रपटातील गाणे हे प्रत्येकाला आवडतं. आईपासून आपण कोणीच कधीच दूर राहण्याचा विचार करु शकतं नाही. या अनुभवाला गीतकाराने खूप सुंदर शब्दात मांडलंय.

4/9

1968 च्या राजा और रंक या हिंदी चित्रपटातील तू कितनी अच्छी है हे गाणे नेहमीच सर्वांच्या पसंतीस पडलंय. तुम्ही तयार केलेल्या रीलला हे गाणं उत्तम बसेल. 

5/9

रंग दे बस्ती चित्रपटातील लुक्का छुप्पी या गाण्यात आई आणि मुलामधील संवाद गाण्याच्या रूपात दाखवण्यात आलाय. चिमुकल्यासोबत मदर्स डेसाठी तुम्ही रील तयार करणार असाल हे गाणं सुंदर आहे. 

6/9

यारियांमधील जब चोट कभी...हा भावपूर्ण ट्रॅकही अनेकांना आवडतो. या गाणावरही आईसोबतचे तुमचे सुंदर फोटो अनेकांना तुमचं रील पसंतीस पडले. 

7/9

तुम्हाला एखाद मजेदार गाणं हवं असेल तर सोनम कपूरच खुबसुरतमधील मा का फोन तुम्हाला नक्कीच आवडेल. .

8/9

प्रियंका चोप्रा मेरी काम या चित्रपटातील तेरी मैं बालाएँ लूँ. तुझे मैं दुआएँ दूँ. तुझको मैं खुशियों के साए दूँ ; हे गाणं तर रिल्सला खूप अप्रतिम वाटतं. 

9/9

मेरी प्यारी अम्मी हे सिक्रेट सुपरस्टारमधील गाणंही तुम्हाला रिल्ससाठी नक्कीच आवडेल. आजच्या आईसाठी एकदम मस्त गाणं आहे हे.