भारतात 71,96,000 WhatsApp अकाऊंट बॅन; काय आहे नेमकं प्रकरण?

मेटाने भारतात 71,96,000 WhatsApp अकाऊंट बॅन केले आहेत. 

Jan 02, 2024, 20:54 PM IST

 WhatsApp ban indian  account :  Meta  कंपनीने भारतात मोठी कारवाई केली आहे. भारतात 71,96,000 WhatsApp अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. सेफ्टी नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 

 

1/7

 Meta नं भारतात 71,96,000 WhatsApp अकाऊंट बॅन केले आहेत. आजपर्यंतची ही सर्वाद मोठी कारवाई मानली जात आहे. 

2/7

मेटानं कम्युनिटी गाऊलाईन्स नुसार Instagram आणि फेसबुकवरुन मोठ्या प्रमाणात कंटेट हटवला आहे. आता WhatsApp अकाऊंटवर देखील कारवाई करण्यात आली आहे. 

3/7

WhatsApp च्या नियम आणि अटींनुसार अकाऊंट ऑपरेट होत नसेल तरी अकाऊंट बंद केले जातात. तसेच गुन्हेगारी घटनांमध्ये वापरले गेलेले अकाऊंट देखील बॅन केले जातात.

4/7

 WhatsApp कडे अनेक अकाऊट रिपोर्ट, तसेच बॅन करण्या संदर्भातील जवळपास 10 हजार तक्रारी आल्या होत्या.

5/7

बॅन करण्यात आलेल्या आकाऊंटपैकी 19 लाख 54 हजार अकाऊंट कंपनीने कोणतीही तक्रार न करता बॅन केले आहेत.

6/7

2023 या वर्षात  1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान कंपनीने भारतात 71 लाख 96 हजार अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. 

7/7

Meta  कंपनीने आयटी नियम 2021 अंतर्गत ही कारवाई केली आहे. युजर सेफ्टी रिपोर्ट नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.