मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मोठी सवलत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय

निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार मोठी सवलत मिळणार आहे.  लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. 

| May 03, 2024, 14:13 PM IST

Mumbai Metro Passengers Discount:निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार मोठी सवलत मिळणार आहे.  लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. 

1/7

प्रवाशांना तिकिटावर 10 टक्के सवलत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रशासनाचा निर्णय

Loksabha Election 2024 Mumbai Metro passengers will get 10 percent discount on tickets on election day

Mumbai Metro: महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होतेय. पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रांसाठी 20 मे रोजी मतदान होईल. या दिवशी मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या सर्व प्रवाशांना तिकिटावर 10% सवलत मिळणार आहे. 

2/7

सर्व माध्यमातून सवलत

Loksabha Election 2024 Mumbai Metro passengers will get 10 percent discount on tickets on election day

महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे. ही सवलत मुंबई मेट्रो 1 कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे. 

3/7

90 कोटी नागरिकांचा प्रवास

Loksabha Election 2024 Mumbai Metro passengers will get 10 percent discount on tickets on election day

मुंबई मेट्रो मार्ग 2अ आणि 7 च्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 90 कोटी नागरिकांनी प्रवास केला असल्याने मुंबई मेट्रोचा उपयुक्तता अधोरेखित झाली आहे. 

4/7

पाचव्या टप्प्यातील मतदान

Loksabha Election 2024 Mumbai Metro passengers will get 10 percent discount on tickets on election day

मुंबई मध्ये लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. खर तर हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदार म्हणून मतदान करण्याकरीता या उत्सवात लोकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी शासनामार्फत सर्व स्तरातून जनजागृती करण्यात येत आहे. 

5/7

मतदानाचा आपला हक्क

Loksabha Election 2024 Mumbai Metro passengers will get 10 percent discount on tickets on election day

सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

6/7

मतदार जागरूकता आणि सहभाग उपक्रम

Loksabha Election 2024 Mumbai Metro passengers will get 10 percent discount on tickets on election day

लोकसभा निवडणुक 2024 मध्ये मतदान करण्यासाठी मेट्रो प्रवाशांना प्रोत्साहित करून त्यांच्या मतदानाच्या कर्तुत्वाबाबत जाणीव करून देण्यासाठी, महामुंबई मेट्रो मतदार जागरूकता आणि सहभाग (SVEEP) या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. 

7/7

मतदान केंद्रापर्यंत आरामदायक प्रवास

Loksabha Election 2024 Mumbai Metro passengers will get 10 percent discount on tickets on election day

मुंबई मेट्रोने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवास करावा या दृष्टीने महामुंबई मेट्रो प्रयत्नशील आहे.  या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करता येईल आणि त्यांना  केंद्रापर्यंत आरामदायक प्रवास करता येणार आहे.