राहुल.. तुस्सी ना जावो! 'या' खेळाडूंनी हेड कोच द्रविड यांना केली खास विनंती

Team India Head Coach : येत्या जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप संपल्यावर भारताचा सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशातच आता बीसीसीआयने भारतीय पुरूष क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकाचा शोध युद्धपातळीवर सुरू केलाय.

| May 16, 2024, 11:01 AM IST
1/8

बीसीसीआयने यासाठी हेड कोचसाठी नुकतंच अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जय शहा यांनी नुकतीच याची घोषणा केलीये.

2/8

राहुल द्रविड यांच्यानंतर एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या पदासाठी ते तगड उमेदवार आहेत.

3/8

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी राहुल द्रविड यांच्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत. राहुल द्रविड अर्ज करू शकतात, असं बीसीसीआयने सांगितलं होतं. 

4/8

मात्र, राहुल द्रविड आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती देखील समोर आली आहे. राहुल द्रविड पदावरून पायउतार होणार असल्याचं समजतंय.

5/8

अशातच आता मीडिया रिपोर्टनुसार, अनेक वरिष्ठ भारतीय खेळाडूंना द्रविडने कसोटी संघात एक वर्षासाठी आपली भूमिका सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  

6/8

राहुल द्रविड यांचा करार गेल्या वनडे वर्ल्ड कप पर्यंतच होता. त्यानंतर बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता.

7/8

अशातच आता राहुल द्रविड यांनी करारमुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाकडे अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत 27 मे आहे.

8/8

दरम्यान, येत्या तीन आठवड्यात प्रमुख प्रशिक्षकाच्या रेसमध्ये कोण कोण आहे? यावर शिक्कामोर्तब होणार आहे.