10 हजारांहून कमी किंमतीत मिळतोय 'हा' 5G फोन! Special Sale फक्त काही दिवस; पाहा फिचर्स

Best 5g Phone Under 10000 Rs: सध्या सुरु असलेल्या एका विशेष सेल अंतर्गत हा फोन अगदी 10 हजार रुपयांच्या खाली उपलब्ध असून सेलचे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या फोनचे फिचर्स पाहून तुम्हालाही हा फोन घ्यावा का असं वाटल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात सविस्तर तपशील, फिचर्स आणि किंमत...

| Jan 17, 2024, 15:30 PM IST
1/9

Best 5g Phone Under 10000 Rs samsung galaxy f14 5g features and price

फ्लिपकार्टवर आता प्रजासत्ताकदिनानिमित्त रिपलब्लिक डे सेल सुरु होत आहे. या सेलअंतर्गत अनेक फोनवर घसघशीत सूट मिळत आहे.

2/9

Best 5g Phone Under 10000 Rs samsung galaxy f14 5g features and price

13 तारखेपासून 19 तारखेपर्यंत फ्लिपकार्टवर ही ऑफर सुरु आहे. या सेलमध्ये थेट डिस्काऊंटबरोबरच विशेष बँक ऑफर्सही आहेत.

3/9

Best 5g Phone Under 10000 Rs samsung galaxy f14 5g features and price

तुम्ही पण या सेलअंतर्गत एखादा चांगला 5 जी फोन शोधत असाल तर सॅमसंगचा गॅलेक्सी एफ14 5G फोनचा विचार करता येईल. हा स्वस्तात मस्त फोन फारच उत्तम आहे.

4/9

Best 5g Phone Under 10000 Rs samsung galaxy f14 5g features and price

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5G च्या बेस व्हिरिएंट 10,490 रुपयांना उपलब्ध आहे. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसहीत हे व्हेरिएंट उपलब्ध आहे.

5/9

Best 5g Phone Under 10000 Rs samsung galaxy f14 5g features and price

आयसीआयसीआय बँकेचं कार्ड असलेल्यांना या फोनवर 10 टक्के सूट मिळत आहे. म्हणजे या फोनची किंमत 10 हजारांखाली जाईल.

6/9

Best 5g Phone Under 10000 Rs samsung galaxy f14 5g features and price

6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसहीतचं व्हेरिएंट 11,490 रुपयांना उपलब्ध आहे. यावरही बँक ऑफर असून हा फोन अधिक स्वस्त मिळू शकतो.

7/9

Best 5g Phone Under 10000 Rs samsung galaxy f14 5g features and price

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5G मध्ये 6.6 इंचांचा फूल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन ऑक्टाकोअर Exynos 1330 प्रोसेसरवर काम करतो.

8/9

Best 5g Phone Under 10000 Rs samsung galaxy f14 5g features and price

50 मेगपिक्सल+2 मेगापिक्सल रेअर कॅमेरा सेटअप सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5G मध्ये आहे. 

9/9

Best 5g Phone Under 10000 Rs samsung galaxy f14 5g features and price

सॅमसंग गॅलेक्सी एफ14 5G ची बॅटरी 6000 एमएएचची आहे. हा फोन जांभळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.