चंद्रावर बर्फच बर्फ! भारतीय वैज्ञानिकांनी सादर केले पुरावे; जगभरातील संशोधक अचंबित

चंद्रावर मोठ्या प्रमाणात बर्फाचा साठा उपलब्ध असल्याचा दावा भारतीय संशोधकांनी केला आहे. 

| May 04, 2024, 22:11 PM IST

 ISPRS : भारतीय वैज्ञानिकांनी   चांद्रयान-2  ने गोळा केलेल्या डेटाच्या मदतीने सर्वात मोठा दावा केला आहे. चंद्रावर अपेक्षापेक्षा जास्त बर्फ असल्याचा दावा संशोधन अहवालात करण्यात आला आहे. याचे पुरावे देखील भारतीय वैज्ञानिकांनी सादर केले आहेत. 

1/7

जगभरातील संशोधक चंद्रावर पाण्याचा शोध घेत आहेत. अशातच चंद्रावर बर्फच बर्फ असल्याचा मोठा खुलासा  भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे. 

2/7

चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू मोठ्या प्रमाणात असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. चंद्रावर पाण्याचे स्त्रोत सापडल्याने लवकरच चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. 

3/7

चंद्राच्या उत्तर ध्रुवीय प्रदेशात दक्षिण ध्रुवांपेक्षा दुप्पट बर्फ आहे. प्राचीन काळी चंद्रावर आलेल्या ज्वालामुखीमुळे बाहेर पडलेल्या वायूमुळे चंद्रावर बर्फाची उत्पत्ती झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

4/7

NASA च्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) वर असलेल्या सात उपकरणांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. भारताच्या चांद्रयान-2 चंद्राच्या कक्षेतील रडार डेटाचा अभ्यास करण्यात आला. 

5/7

चंद्रावरती थोडाथोडका नव्हे तर तब्बल 40 हजार चौरस किलोमीटर इतक्या विस्तृत क्षेत्रावर पाणी असल्याचं यापूर्वीच्या संशोधनात आढळून आले आहे. 

6/7

ISPRS जर्नल ऑफ फोटोग्रामेट्री आणि रिमोट सेन्सिंगमध्ये चंद्रावरील पाण्याच्या स्त्रोतांबाबत खुलासा करण्यात आला आहे.  इस्रो स्पेस ॲप्लिकेशन सेंटर (SAC) चे टी चक्रवर्ती  या संशोधनाबाबत सखोल माहिती दिली आहे. 

7/7

चंद्रावर मुबलक पाणी असल्याचा दावा, नासाच्या शास्त्रज्ञांनी केला होता. मात्र, आता संशोधनादरम्यान भारतीय वैज्ञानिकांनी सादर केलेल्या पुराव्यांमुळे जगभरातील संशोधक अचंबित झाले आहेत.