'या' 7 भारतीय चित्रपटांचं कान्समध्ये स्क्रीनिंग; मराठमोळ्या कलाकारांचीही वर्णी

Cannes 2024 : काही भारतीय चित्रपटांनाही कान्स महोत्सवामध्ये स्थान मिळालं असून, त्यांची ही कान्सवारी अर्थातच खास ठरणार आहे. स्मिता पाटील यांच्याही एका चित्रपटाची कान्सवारी... पाहा या चित्रपटाचं नाव आणि दमदार स्टारकास्ट   

May 15, 2024, 11:28 AM IST

Cannes Film Festival 2024 : 77 व्या कान्स चित्रपट महोत्सव 2024 ची सुरुवात झाली असून, 14 मे पासून या चित्रपट महोत्सवामध्ये कलेचा बहुरंगी नजराणा सादर केला जाणार आहे. 

 

1/7

Sunflowers Were The First Ones to Know

Cannes 2024 8 Indian Films To Be Screened here is the list

एफटीआयआय पुणे, यांच्याशी संलग्न असणआऱ्या या कलाकृतीला साकारलं आहे चिदानंद नाईक यांनी. या कलाकृतीच्या ध्वनी संयोजनाची अतिशय चर्चा होताना दिसत आहे.   

2/7

संतोष

Cannes 2024 8 Indian Films To Be Screened here is the list

सुहाना गोस्वामीची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटातून एका सक्षम महिलेची कछा साकारण्यात आली आहे. संध्या सुरीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.   

3/7

ऑल वी इमॅजिन अॅज लाईट

Cannes 2024 8 Indian Films To Be Screened here is the list

पायल कपाडिया दिग्दर्शित All We Imagine As Light या चित्रपटातून प्रभा नावाच्या स्त्रीपात्रावर उजेड टाकण्यात आला आहे. जवळपास वर्षभर पतीचा निरोप न मिळालेल्या प्रभाला एक दिवस त्याचं सर्व सामान पाठवण्यात येतं आणि पुढे हे कथानक परिस्थितीनुरूप पुढे जातं...   

4/7

मंथन

Cannes 2024 8 Indian Films To Be Screened here is the list

श्याम बेनेगल दिग्दर्शित 'मंथन' या चित्रपटामध्ये गिरीश कर्नाज, नसिरुद्दीन शाह, स्मिता पाटील या आणि अशा दिग्गज कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.   

5/7

सिस्टर मिडनाईट

Cannes 2024 8 Indian Films To Be Screened here is the list

करण कंधारी दिग्दर्शित 'सिस्टर मिडनाईट' या चित्रपटामध्ये एका लहान खेड्यातील विवाहितेला गजबजाटाच्या शहरात नेमका कसा संघर्ष करावा लागतो असं कथानक साकारण्यात आलं आहे. राधिका आपटेनं या चित्रपटाच मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.   

6/7

द शेमलेस

Cannes 2024 8 Indian Films To Be Screened here is the list

कुंटणखान्यातून पळ काढलेल्या एका स्त्रीपात्राला नशीब पुन्हा त्याच दलदलीत लोटलं आणि पुढं नेमकं काय घडत जातं याचं चित्रण या चित्रपटातून करण्यात आलं आहे. मैत्री आणि प्रेमाच्या नात्यावर Konstantin Bojanov दिग्दर्शित या चित्रपटातून उजेड टाकण्यात आला आहे. (Cannes Film Festival 2024)   

7/7

बनीहूड

Cannes 2024 8 Indian Films To Be Screened here is the list

युकेस्थित भारतीय वंशाच्या मानसी महेश्वरीची 'बनीहूड' ही कलाकृती यंदाच्या कान्समधील आकर्षणाचा विषय ठरणार आहे.