Akshaya Tritiya Wishes in Marathi : अक्षय्य तृतीयेला 'या' मराठी शुभेच्छाने द्विगुणीत करा कुटुंब आणि मित्रपरिवाराचा आनंद

Akshaya Tritiya Wishes in Marathi : साडेतीन मुहुर्तांपैकी एक असा अक्षय्य तृतीयाचा सण शुक्रवारी 10 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी केलेली अक्षय राहतात, त्यामुळे यादिवशी दान, पुण्यला विशेष महत्त्व आहे. या शुभ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारांना देऊन अक्षय्य तृतीयेचा आनंद द्विगुणीत करा. 

May 09, 2024, 22:05 PM IST
1/8

सुवर्ण क्षणांच्या आठवणी, लक्ष्मी अक्षय्य तृतीयेच्या दिनी, जीवनदीप जाई उजळुनी, सुख, समृद्धी लाभो जीवनी, भक्ती-प्रेमरस ओथंबुनी, बंधुभाव वाढे जनगणमनी, अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा...

2/8

 तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो, लक्ष्मीचा सदैव वास राहो.. संकटांचा नाश होवो, आणि शांतीचा वास राहो.. अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा  

3/8

अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी, माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा...  

4/8

 आशा आहे या मंगलदिनी, आपल्या जीवनात नवचैतन्य येवो.. येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद, सुख, समाधान घेऊन येवो.." अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

5/8

 प्रत्येक काम होवो पूर्ण.. न काही राहो अपूर्ण.. धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन.. घरात होवो लक्ष्मीचं आगमन.." अक्षय्य तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा!  

6/8

आज अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!! आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख, धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!! माझ्या कडून तुम्हाला, अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा..!  

7/8

अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती.. अक्षय राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती.. अक्षय्य तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!  

8/8

तुमच्या घरी सुख-समृद्धीची लाट येऊ दे, तुमच्या आनंदाला कोणाची नजर ना लागू दे, तुमच्या चेहऱ्यावरील हास्य असेच कायम राहू दे, अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...