Mumbai Crime : मित्रानेच घात केला आणि...; अल्पवयीन मुलीवर 8 आरोपींकडून बंद बंगल्यात अत्याचार

Mumbai Crime : या घटनेनंतर पालघरमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपींनी आलटूपालटून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

Updated: Dec 19, 2022, 12:25 PM IST
Mumbai Crime : मित्रानेच घात केला आणि...; अल्पवयीन मुलीवर 8 आरोपींकडून बंद बंगल्यात अत्याचार title=

Palghar Mumbai Gang Rape Case : पालघर जिल्ह्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पालघर जिल्ह्यातील सातपाटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला आहे. एका 16 वर्षीय मुलीवर 8 जणांनी रात्रभर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.

मित्रानेच केला घात

या प्रकरणात मित्रानेच विश्वासघात करत तरुणीवर अत्याचार केला आहे. रात्री 8 वाजल्यापासून  सकाळपर्यंत या तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात येत होते. 16 डिसेंबर रोजी पीडित तरुणी मित्राने बोलवलेल्या ठिकाणी गेली होती. त्यानंतर माहीम परिसरात असलेल्या टेंभी येथील बंद  बंगल्यामध्ये युवतीवर तिच्या मित्रासह 8 जणांनी बलात्कार केला. 

निर्जनस्थळी पुन्हा बलात्कार

आरोपींनी एवढ्यावरच न थांबता पीडित मुलीला माहीम बीचजवळील निर्जन ठिकाणी घेऊन गेले. तिथेही मुलीवर अत्याचार केले. 16 डिसेंबरच्या रात्री 8 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आला. 

सर्व आरोपींना अटक 

यानंतर अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस चौकीत जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह आयपीसी 376 (ड) , 366 (अ), कलम 341, कलम 342, 323 द्वारे गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता उर्वरित आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.