CBSE मागोमाग HSC, SSC चेही निकाल; जाणून घ्या तारीख, वेळ आणि कुठे पाहाल Marksheet

Maharashtra State Board Results 2023 : परीक्षा झाल्या सुट्टीही झाली. आता निकालांचे दिवस जवळ यायला लागले. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी कोणत्या लिंकवर जावं? इथे मिळेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर 

Updated: May 12, 2023, 03:37 PM IST
CBSE मागोमाग HSC, SSC चेही निकाल; जाणून घ्या तारीख, वेळ आणि कुठे पाहाल Marksheet  title=
maharashtra board result 2023 date time and how to check results marksheets

Maharashtra State Board Results 2023 : सीबीएसई बोर्डाचा निकाल लागल्यानंतर आता त्यामागोमागच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल नेमके कधी लागणार याबाबतचे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. 

मे महिन्याचा पहिला पंधरवडा आता जवळपास संपण्याच्या मार्गावर असून, पुढच्या आठवड्यापर्यंत राज्यातील HSC आणि SSC परीक्षांचे निकाल नेमके कधी लागणार याबाबतची तारीख जाहीर केली जाऊ शकते. दरम्यान, शिक्षण मंडळाकडून मात्र याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. असं असलं तरीही आतापासूनच कोणत्या लिंकवर निकाल पाहता येईल, पर्यायी संकेतस्थळं कोणती हे आणि असे अनेक प्रश्न डोकं वर काढताना दिसत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या अखेरीपासून जूनच्या पहिल्या दहा दिवसांपर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : CBSE चे इयत्ता बारावीचे निकाल जाहीर ; जाणून घ्या कुठे पाहाल Marksheet 

दहावी- बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहेत. शिवाय mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या संकेतस्थळांवरही निकाल पाहता येणार आहेत. शिवाय झी 24तास च्या संकेतस्थळावरही तुम्हाला हा निकाल पाहता येणार आहे. 

निकाल पाहताना नेमकं काय करावं? 

- निकालाच्या दिवशी https://www.mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या. 
- तिथं देण्यात आलेल्या HSC किंवा SSC 2023 निकालांच्या लिंकवर क्लिक करा. 
- एचएससीचा निकाल पाहत असाल तर तिथं हॉलतिकीट क्रमांक आणि आवश्यक माहितीची पूर्तता करा. 
- माहितीची पूर्तता केल्यानंतर काही क्षणांतच निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. 

निकाल पाहण्यासाठी MSBSHSE संकेतस्थळावर आल्यानंतर तिथं आवश्यक माहितीसोबतच जन्म तारीख आणि इतक माहितीची पूर्तता करणं बंधनकारक असेल याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी. 

परीक्षांचे दिवस आठवताना... 

यंदाच्या म्हणजेच 2023 या वर्षात राजच्यात 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तर, 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातून तब्बल 1577256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती, तर जवळपास 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.