मुंबईकरांवर पाणीकपातीचे मोठे संकट

 धरण क्षेत्रात म्हणावा तितका पाऊस न झाल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे मोठे संकट (Mumbai water problem) उभे राहिले आहे.  

Updated: Jul 13, 2021, 09:45 AM IST
मुंबईकरांवर पाणीकपातीचे मोठे संकट title=

मुंबई : राज्यात मुसळधार (Rain) पावसाने चांगलेच झोडपून काढत आहे. तर त्याआधी मान्सूनच्या पहिल्या पावसाने मुंबईची (Mumbai) चांगलीच दैना उडवून दिली होती. मुंबईची तुंबई झाली होती. त्यामुळे अनेकांचे हाल झाले होते. मात्र, पाऊस पडत असला तरी धरण क्षेत्रात म्हणावा तितका तो न झाल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे मोठे संकट (Mumbai water problem) उभे राहिले आहे. (Big water crisis in Mumbai)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत 17.43 टक्के साठा शिल्लक आहे. मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. (Mumbai water problem) सातही तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांत 9हजार 321दशलक्ष लीटर पाणी घटले आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे. (Mumbai to face cut in water supply )

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात कमी पाणी असल्याने पाणीकपातीचे संकट आहे. आता पावसाने दमदार हजेरी लावली तरच मुंबईकरांवरची पाणी कपात टळू शकते. मुबलक पाण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असून, पावसाने आणखी काही दिवस दडी मारल्यास मुंबईत पाणीकपात होण्याची शक्यता आहे.