आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ

पालघर मधील जव्हार आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर अंघोळ करावी लागतेय. 

Updated: Dec 12, 2023, 09:48 PM IST
आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ title=

Adivasi Ashram School in Palghar : सरकार शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक घोषणा करत आहे. प्रत्यक्षात मात्र, आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कड्याक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर  अंघोळ करावी लागतेय. आश्रम शाळेत बाथरुम नसल्याने विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी नदीवर जावे लागतेय. पालघर जिह्यातील एका आश्रमशाळेतील हा धक्कादायक प्रकार आहे. देश घडवणाऱ्या पिढीला आत्तापासून मोठा संघर्ष करावा लागत आहे. 

पालघर मधील जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वात्सल्य प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा चाबके - तलावली या निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थांना अनेक अचणींचा सामना करावा लागतोय. येथे पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत स्नानगृहच नाही. यामुळे येथे राहणाऱ्या  विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून नदीत आंघोळीसाठी जावं लागत आहे. 

कडाक्याची थंडी आणि पाऊस याचा विचार न करता या आश्रम शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी स्नानगृह नसल्याने आपला जीव धोक्यात टाकून नदीतील वाहत्या पाण्याचा प्रवाहात आंघोळी साठी जावं लागत आहे. कडाक्याच्या थंडीत देखील हे चिमुकले विद्यार्थी कोणत्याही सुरक्षा शिवाय नदीत अंघोळीसाठी जातात.  ह्या वेळेस त्यांच्या सोबत कोणताही शिक्षक जात नसल्याचेही या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे आदिवासी विकास प्रकल्पांच्या अनुदानित आणि विनाअनुदान आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आदिवासी विकास विभाग वर्षाला कोट्यावधी रुपये निधी खर्च करत . मात्र हा खर्च केला जाणारा निधी नेमका जातो कोणाच्या खिशात असा प्रश्न या सगळ्या प्रकारानंतर उभा राहिला आहे. आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्नानगृह आणि स्वच्छतागृह या सुविधा देणे बंधनकारक असताना देखील या आश्रम शाळेत ह्या प्रकारच्या कोणत्याही सुविधा नसल्याचं येथील विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.

बँकिंग कामकाजाच्या सहलीचे आयोजन

व्यंकटेश फाउंडेशन मार्फत जि.प प्रा.शाळा,बोधेगाव मधील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यासाठी आर्थिक साक्षरता अभियाना अंतर्गत बँकिंग कामकाजाच्या सहलीचे आयोजन करून प्रत्यक्ष बँकिंग कामकाज कसे चालते ,बँक मध्ये कोणत्या सुविधा दिल्या जातात , शाखा व्यवस्थापक ,कॅशिअर,क्लार्क ,यांचे काम कसं चालतं , भरणा स्लीप , विड्रॉ स्लीप, खाते उघडण्याचा फॉर्म, ATM, चेक बुक, तिजोरी, लॉकर हे सर्व प्रत्यक्ष दाखवून माहिती देण्यात आली ,या वेळी मुलांनी त्यांच्या मनातील कुतुहालाचे अनेक प्रश्न विचारले व  विविध बाबींची माहिती घेतली.  व्यंकटेश मल्टीस्टेटच्या सर्व शाखेच्या माध्यमातून शाखेच्या परिसरातील इयत्ता ४ थी ते १०वीच्या विद्यार्थी असणाऱ्या शाळेमध्ये राबवणार आहे. जवळपास 130 शाळांमधील 20 हजारांहून अधिक विद्यार्थी या बचत बँकेशी जोडले गेले आहेत.व्यंकटेश फाऊंडेशनच्या प्रवासाबाबत कृष्णा मसुरे यांनी सांगितले की, व्यंकटेश उद्योग समूहाने व्यवसाय करतानाच सामाजिक बांधिलकीही जपण्याचे ठरवून व्यंकटेश फाऊंडेशनची मुहूर्तमेढ 2015 रोवली. केवळ स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगायचं. आज सभोवताली, समाजामध्ये आणि देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये सक्षमीकरणाची गरज आहे.