Maharashtra Kesari : शिवराज राक्षेने मारले 'महाराष्ट्र केसरी'चे मैदान, काकासाहेब पवारांच्या शिरपेचात मानाचा तूरा!

Maharashtra Kesari Kusti Won Shivraj Rakshe : शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडवर मात करत चांदीची गदा उंचावली आहे. या विजेतेपदानंतर आता शिवराज राक्षेला महिंद्रा थार जीप व रोख रक्कम पाच लाखांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला तर उपविजेता ठरलेल्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखाचे बक्षीसाने सन्मान करण्यात आला. 

Updated: Jan 14, 2023, 10:31 PM IST
Maharashtra Kesari : शिवराज राक्षेने मारले 'महाराष्ट्र केसरी'चे मैदान, काकासाहेब पवारांच्या शिरपेचात मानाचा तूरा!  title=

Maharashtra Kesari Kusti Won Shivraj Rakshe : यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मान शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) पटकावला आहे. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत शिवराजने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटात चितपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा उंचावली आहे. शिवराजच्या  (Shivraj Raksheया विजयाने वस्ताद काकासाहेब पवार यांच्या शिरपेचात आणखीण एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. 

शिवराज (Shivraj Rakshe) हा पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथील राक्षेवाडीचा आहे. त्याने वस्ताद काकासाहेब पवार यांच्या आखाड्यात तालमीचे धडे घेतले आहेत. या आखाड्यात प्रचंड मेहनत घेतल्यानंतर आता त्याने महाराष्ट्र केसरीचे (Maharashtra Kesari Kusti)  मैदान मारले आहे. शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडवर मात करत चांदीची गदा उंचावली आहे. या विजेतेपदानंतर आता शिवराज राक्षेला महिंद्रा थार जीप व रोख रक्कम पाच लाखांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला तर उपविजेता ठरलेल्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखाचे बक्षीसाने सन्मान करण्यात आला. 

चर्चा कोणाची अन् विजय कोणाचा? 

हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) महाराष्ट्र केसरीचा मान पटकावेल अशी कुस्तीप्रेमींमध्ये चर्चा होती. या चर्चेला आणखीण ऊत त्यावेळेस आले जेव्हा, गादी विभागात हर्षवर्धन सदगीर अंतिम सामन्यात पोहोचला होता, कारण त्याने याआधी देखील महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. त्यामुळे तो दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीवर नाव कोरेल अशी कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता होती. मात्र गादी विभागाच्या अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने त्याचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. 

दोस्तीमध्ये कुस्ती

गादी विभागामध्ये हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या तुफान कुस्तीमध्ये पहिल्या पासूनच शिवराजने आक्रमण केलं. पहिल्या फेरी अखेर शिवराजने 6 गुण मिळवले होते तर एकवेळचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनला एकही गुण घेता आला नव्हता. दुसऱ्या फेरीमध्ये 1 गुण सोडता शिवराजने 2  गुणांची विजयी आघाडी घेत विजय साकार केला. शिवराज राक्षेने (Shivraj Raksheहर्षवर्धनवर 1-8 ने विजय मिळवला.

एकाची बाजी तर दुसऱ्याचा पराभव

खरं तर गादी विभागातून काकासाहेब पवार यांचेच दोन पठ्ठे म्हणजेच शिवराज राक्षे (Shivraj Raksheआणि हर्षवर्धन सदगीर हे फायनल मध्ये पोहोचले होते. हे दोघे एकाच आखाड्यात सराव करतात. चांगले मित्र देखील आहेत. मात्र याच मित्रांच्या दोस्तीमध्ये गादी विभागात कुस्ती रंगली होती. या कुस्तीत शिवराज राक्षेने विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली होती. हा अनपेक्षित निकाल होता. कारण हर्षवर्धन सदगीर दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले, अशी चर्चा होती. मात्र या उलट सामन्यात घडले.

महाराष्ट्र केसरीच्या फायनल सामन्यात शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) आणि महेंद्र गायकवाडमध्ये अंतिम लढत झाली. हा सामना सुरु होण्याच्या काही मिनिटातच शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला मैदानात चीतपट करत विजय मिळवला आहे. अंतिम सामन्यात मोठी अटीतटीची लढत होईल अशी कुस्तीप्रेमींची अपेक्षा होती.मात्र सामना सुरु होण्याच्या अवघ्या 2 मिनिटाच्या आतच शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत चीतपट करून महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. अशाप्रकारे काकासाहेब पवार यांचा पैलवानाने बाजी मारत महाराष्ट्र केसरीवर नाव कोरले.