Maharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्या

Maharashtra MBA CET 2024:  महाराष्ट्र एमबीए सीईटी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कसा पाहायचा याची माहिती जाणून घ्या.

मानसी क्षीरसागर | Updated: May 16, 2024, 11:22 AM IST
Maharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्या title=
Results of MAH MBA CET 2024 announced by Maharashtra State Common Entrance Test Cell Know how to check

Maharashtra MBA CET 2024: महाराष्ट्र एमबीए सीईटी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र कॉमन एंट्रेस टेस्ट सेलने (MHT CET Cell) राज्याच्या विविध मॅनेजमेंट महाविद्यालयांनी संचालित केलेल्या मॅनेजमेंट पीजी कोर्सेसमध्ये (MBA, PGDBM) या वर्षीसाठी आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षाचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. सीईटी सेलने (Maharashtra MBA CET Result 2024) ची घोषणा केली आहे. तसंच, विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्डदेखील जारी केले आहेत. 

महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलद्वारे 9 ते 11 मार्च 2024 पर्यंत आयोजित प्रवेश परीक्षांसाठी सहभागी झालेल्या उमेदवारांनी त्यांचा निकाल पाहण्यासाठी आणि स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत पोर्टलवर cetcel.mahacet.org वर व्हिजिट करु शकता. त्यानंतर होम पेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन डायरेक्ट लिंकवरुन विद्यार्थी स्कोअर कार्ड डाउनलोड पेजवर जाऊ शकता. या पेजवर उमेदवार त्यांचा रजिस्टर इमेल आयडी आणि पासवर्डचा तपशील टाकून लॉग-इन करु शकतात. त्यानंतर त्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. ते स्कोअर कार्ड डाइनलोड आणि प्रिंटदेखील करु शकता. 

दरम्यान, MHT CET सेलने महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षेचे आयोजन 9 ते 11 मार्चदरम्यान केले होते. त्यानंतर 1 एप्रिल रोजी तात्पुरती उत्तरपत्रिका प्रसिद्ध करून उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर, आता निकालाच्या घोषणेसह (MHT महाराष्ट्र MBA CET निकाल 2024) अंतिम निकाल यादीदेखील जाहीर केली आहे. 

या वर्षी एमबीए सीईटी प्रवेश परीक्षेच्या सहभागाबाबत, नोंदणी केलेल्या 130,927 विद्यार्थ्यांपैकी 112,209 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि उपस्थितीची टक्केवारी 85.7 टक्के इतकी होती. महाराष्ट्र MBA प्रवेश परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र CET सेलद्वारे केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) सुरू केली जाईल. या माध्यमातून राज्यातील तीनशेहून अधिक महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे.