Raigad Bus Accident : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात, एक जण ठार 19 जण जखमी

Mumbai Goa Highway : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनाला बंदी असतानाही वाहतूक सुरु आहे. 

नेहा चौधरी | Updated: Sep 17, 2023, 08:07 AM IST
Raigad Bus Accident : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात, एक जण ठार 19 जण जखमी title=
mumbai goa highway Raigad Bus Accident heavy vehicle Maharashtra News ganeshoutsav 2023

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि एसटी बसचा (Raigad Bus Accident) अपघात झालाय. एस टी बसनं ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात (Raigad Accident) झालाय. माणगावजवळच्या रेपोली इथं पहाटे साडेचार वाजता हा अपघात झालाय. यात एक जण ठार तर 19 जण जखमी झालेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2023) चाकरमानी गावी निघाले हाते.

ही बस मुंबईहून राजापूरकडं निघाली होती. (mumbai goa highway Raigad Bus Accident heavy vehicle Maharashtra News ganeshoutsav 2023)