Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा 'यांच्या' वाट्याला

Lok Sabha Election 2024 :  राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातल्या जागांचा मविआचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. 

नेहा चौधरी | Updated: Jan 29, 2024, 09:44 AM IST
Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा 'यांच्या' वाट्याला title=
Lok Sabha Election 2024 mahavikas aghadi became the seat allocation formula in Marathwada Most seats

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचा  (MVA) फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्राने जागावाटप होणार आहे. हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षांचे दावे आहेत त्यामुळे याबाबतचा निर्णय फेब्रुवारीत होणार. (Lok Sabha Election 2024 mahavikas aghadi became the seat allocation formula in Marathwada Most seats)

कोणाला कोणत्या जागा हव्यात? 

लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी काँग्रेसला गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अकोला, नांदेड लातूर, सोलापूर, जालना, कोल्हापूर, पुणे, सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या दोन जागा पाहिजे आहेत. तर राष्ट्रवादीला भंडारा - गोंदिया, बीड, शिरूर, बारामती, सातारा,माढा, कोल्हापूर, रावेर, अहमदनगर, दिंडोरी, रायगड, कल्याण  आणि मुंबईतल्या काही जागा तर शिवसेनेला आताच्या 18 जागांसोबत मुंबईत एक जागा जास्त दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई. ईशान्य मुंबई या जागा पाहिजे आहेत. 

mahavikasaghadi

2019 च्या लोकसभेचं गणित काय होतं? 

महाराष्ट्रातील 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील गणित पाहिलं तर त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यानुसार 2019 मध्ये 48 पैकी 23 जागा भाजपने जिंकल्या तर 18 जागांवर शिवसेनेने विजय पटकावला होता. चार जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात तर काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र आता लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपने 45 जागांवर जिंकण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं असून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपचं लक्ष्य आहे. 

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली असून मोदींची प्रत्येक योजना ही सामान्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यामुळे आता इतर पक्ष आपलं भाजपचा सुपडा साफ करण्यासाठी काय फॉम्युमला बनवतात हे बघणं औत्सुकाच ठरणार आहे. तर सध्या प्रत्येक निवडणूक ही शिवसेना-भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असून भाजपच्या रणनीतीनंतर शिवसेना काय करणार हे पाहाव लागणार आहे.