अर्नाळा येथे दोन गटांत गटात तुंबळ राडा, महिलांची फ्री स्टाईल अशी जुंपली की...

Virar land dispute :  अर्नाळा परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन गटातील सदस्य आपापसात फ्री स्टाईल हाणामारी करत असल्याचे दिसून येत आहे. या राड्यात मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग दिसून आला आहे.  

Updated: Jun 22, 2023, 08:44 AM IST
अर्नाळा येथे दोन गटांत गटात तुंबळ राडा, महिलांची फ्री स्टाईल अशी जुंपली की... title=
Virar land dispute and Clash between two groups

Virar land dispute and Clash between two groups : विरारच्या अर्नाळा परिसरात जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. ही सर्व दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाली आहेत. ज्यात दोन गटातील सदस्य आपापसात फ्री स्टाईल हाणामारी करत असल्याचे दिसून येत आहे. या राड्यात मोठ्या संख्येने महिलांचाही सहभाग दिसून आला आहे. यावेळी महिलांची फ्री स्टाईल जोरदार हाणामारी झाली.

शासकीय जमिनीवर असलेल्या घराच्या वादातून दोन गटात राडा झाल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती जवळच असलेल्या अर्नाळा सागरी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती करत परीस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. दरम्यान, परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.

गावातील काही जण शासकीय जागेवर असलेल्या एकाच झोपडीवर कारवाईसाठी तक्रार करीत असल्याने हा वाद निर्माण झाला होता. यावेळी महिला आणि पुरुषांनी दगडफेक केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, या संदर्भात दोन्ही गटातील 40 ते 50 जणांवर अर्नाळा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

घरावर हल्ला दगड आणि विटाफेक

दरम्यान, नाशिकच्या मनमाडमध्ये डोक्यात बाटली फोडल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून आठ ते दहा तरुणांच्या टोळक्याने मुरलीधर भागात घरावर हल्ला दगड व विटाफेक करीत हल्ला चढविल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या हल्ल्यात घराचे खिडक्या, विजेचे मीटर आणि घरासमोर दिव्यांची फोडतोड करण्यात आली आहे. तर घरासमोर दगडांचा मोठा खच पडला होता. याप्रकरणी मनमाड पोलिसात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

पाणी भरण्याच्या कारणावरुन तुंबळ हाणामारी

संभाजीनगरमध्ये रात्री पाणी भरण्याच्या कारणावरुन तुंबळ हाणामारी झालीय.. सुधाकर नगर परिसरात दोन गटात ही तुंबळ हाणामारी झाली आहे. सुधाकर नगर परिसरातील व्हॉल्ववर पाणी भरण्यासाठी लोक जमले होते त्यातून वाद झाला आणि त्यानंतर तुंबळ हाणामारी झाली यात काही लोक जखमी सुद्धा झाले आहे, या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालविल्याप्रकरणी गुन्हा

नालासोपाऱ्यात एका महिला डॉक्टरवर बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिबाला शुक्ला असं या डॉक्टरचं नाव असून वसई विरार पालिकेच्या आरोग्य विभागाने मध्यरात्री स्टींग ऑपरेशन करून या बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी डॉ शुक्ला यांच्यावर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या तक्रारीवरुन तुळींज पोलीस ठाण्यात डॉ. शुक्ला विरोधात कलम 420 , बेकायदेशीर गर्भपात अधिनियम,औषधीद्रव्य व सौंदर्यप्रसादन तसेच वैद्यकीय गर्भ समाप्ती अधिनियम 2003 च्या कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.