‘माझ्यासोबत राहायला ये, तुझं भविष्य उज्ज्वल करेन!’ 53 वर्षांच्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा

Nagpur Crime News: नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 22 वर्षींच्या तरुणीसोबत पोलीस निरीक्षकानेच छेड काढल्याचे समोर आले आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 20, 2024, 04:23 PM IST
‘माझ्यासोबत राहायला ये, तुझं भविष्य उज्ज्वल करेन!’ 53 वर्षांच्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा title=
Case Registered Against Policeman For Molesting Woman in Akola District

Nagpur Crime News: नागपुरात स्पर्धा परिक्षेचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणीसोबत एक भयंकर प्रकार घडला आहे. समाजाचे रक्षकच भक्षक बनले असल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. अकोल्यातील पोलिस ठाण्याच्या निरीक्षकानेच 22 वर्षांच्या तरुणीचा पाठलाग करत तिची छेड काढली. या घटनेनंतर अकोल्यातील खदान पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाविरोधात नंदनवन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, धनंजय सायरे असं आरोपीचे नाव असून तो सायरे मुळचा अमरावतीचा आहे. तर, पीडिताही अमरावतीचीच राहणारी आहे. त्यामुळं दोघ आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. पीडीता ही स्पर्धा परीक्षेची तयार करत असून तिथेच भाड्याने खोली घेऊन राहत होती. पीडीता दररोज शिकवणी वर्गात ये-जा करत होती. 

धनजंय सायरे हा तिच्या वडिलांचा मित्र होता. त्यामुळं तो तिच्या संपर्कात आला होता. त्याने तिला स्पर्धा परीक्षेसाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळं त्यांचे बोलणे सुरू होते. काही दिवसांपूर्वी तिला सायरे याने फोन केला होता. फोनवर त्याने मी अनेकांचे भविष्य घडवले असून तुझेही भविष्य घडवेन त्यासाठी तुला माझ्यासोबत राहावं लागेल, असं म्हणू लागला. मात्र, पीडीत तरुणीला वेळीच त्याच्यावर संशय आला त्यामुळं तिने याबाबत सर्व काही तिच्या आईला सांगितले. मात्र, त्यांनी याकडे फारसे लक्ष न देता अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले. 

पीडीतेने नंतर त्याच्याशी संपर्क केला नाही तसंच, त्याला भेटण्यासही ती जात नव्हती. त्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर ती टाळत होती. या दरम्यान पीडितेचे बदललेले वागणे पाहून धनंजय यांनी पीडीतेचे लोकेशन ट्रेस करुन नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले तिचे घर गाठले. संध्याकाळच्या सुमारास ती बाहेर निघाल्यावर तिचा हात पकडून तु माझ्यासोबतच राहा, असे म्हणत तिची छेड काढू लागला. युवतीने आरडाओरड केल्यानंतर तो तिथून पसार झाला. 

मुलीने हा सगळा प्रकार तिच्या वडिलांना सांगितल्यावर त्यांना नागपुर गाठत नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने पीडित तरुणीही घाबरली आहे.