बागेश्वर बाबा विरोधात गुन्हा दाखल; भंडारा जिल्ह्यात सत्संग सुरु असताना गोंधळ

भंडा-यात सूरजलाल अंबुले यांच्या तक्रारीवरून अखेर धीरेंद्र शास्त्रींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात धीरेंद्र शास्त्री म्हणजे बागेश्वर बाब यांचा सत्संग सुरू आहे.

Updated: Mar 31, 2024, 08:05 PM IST
बागेश्वर बाबा विरोधात गुन्हा दाखल; भंडारा जिल्ह्यात सत्संग सुरु असताना गोंधळ title=

Bageshwar Baba: बागेश्वर बाबा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर बाबा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. बागेश्वर बाबाला अटक करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात  बागेश्वर बाबाचा सत्संग सुरु होता. यावेळी मोठा गोंधळ झाला. 

भंडा-यात सूरजलाल अंबुले यांच्या तक्रारीवरून अखेर धीरेंद्र शास्त्रींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात धीरेंद्र शास्त्री म्हणजे बागेश्वर बाब यांचा सत्संग सुरू आहे. यावेळी त्यांनी मानवधर्माचे संस्थापक जूमदेव ठूब्रिकर यांच्याविरुध्द आक्षेपार्ह विधान करत टीका केली. त्यामुळे लाखो अनुयायांची मनं दुखावल्या प्रकरणी भंडारा गोंदिया जिल्हयातील आणि विविध पोलीस ठाण्यांत धीरेंद्र शास्त्रींविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अजूनही कुठली कारवाही झाली नसल्यानं, हजारोच्या संख्येनं अनुयायांनी भंडारा तुमसर मार्ग बंद करत पोलीस ठाण्यासमोरचा मार्गही बंद केला. 

बागेश्वर बाबाने सत्संग मध्ये मानव धर्माचें संस्थापक जूमदेव ठूब्रिकर यांच्या विरुध्द वादग्रस्त विधान करत टीका केली आहे. त्यामुळे लाखो सेवकांचे मन दुखावल्याने भंडारा गोंदिया जिल्हयातील विविध पोलिस स्टेशन येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही. म्हणुन हजारोच्या संख्येने सेवकांनी (नागरीक) मोहाडी पोलिस स्टेशन गाठले. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आली होती. नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थीत झाले. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आता पोलिस अधीक्षक यांनी आयोजक व धिरेंद्र शास्त्री यांच्या विरुध्द 295 कलम अन्तर्गत गुन्हा दाखल केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी घतेली बागेश्वर बाबाची भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात बागेश्वर बाबाची भेट घेतली. पुण्यामध्ये सध्या बागेश्वर बाबा दरबारात जाऊन फडणवीसांनी बागेश्वर बाबाची भेट घेतली. हार आणि शाल घालून फडणवीसांनी बागेश्वर बाबाचा सत्कार केला. सनातन धर्म हा सगळ्यांना जोडणारा चिरंतन धर्म आहे, असं फडणवीसांनी यावेळी म्हंटलं.