१५ हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची योजना, जाणून घ्या

प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन ( PM-SYM) असे या योजनेचे नाव 

Updated: Apr 29, 2020, 02:36 PM IST
१५ हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची योजना, जाणून घ्या  title=

मुंबई : जर तुमचा मासिक पगार १५ हजार किंवा त्याहून कमी असेल आणि वय ४० वर्षांहून कमी असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने तुमच्यासाठी विशेष पेंशन योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन ( PM-SYM) असे या योजनेचे नाव आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अकाऊंट सुरु करण्याची पद्धत सोप्पी आहे. यासाठी तुम्हाला घराजवळ असलेल्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) मध्ये अर्ज करावा लागेल. जर तुम्हाला CSC बद्दल माहिती नसेल तर एलआयसी किंवा श्रम मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन माहिती मिळवता येईल. याशिवाय जिल्हा रोजगार कार्यालय, एलआयसी ऑफीस, ईपीएफ आणि ईएसआयसी च्या कार्यालयात जाऊन अकाऊंट उघडता येऊ शकेल.

कसे उघडाल खाते ? 

जर कर्मचाऱ्याचे आधीच EPF/NPS/ESIC यापैकी कोणते खाते असेल तर तो या योजनेचा हिस्सा बनू शकत नाही. आयकर भरत असलेल्यांना याचा लाभ मिळणार नाही. 

यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि बॅंक खात्याचा तपशिल लागेल. IFSC कोड, पासबुक इत्यादी

अशी करा नोंदणी

घराजवळ असलेले सीएससी कार्यलय गाठा. ते माहीत नसल्यास एलआयसी, कामगार कार्यालय किंवा सीएससीच्या वेबसाईटवर जा.

सोबतच आधार कार्ड, बॅंक खात्याची डिटेल्स, बॅंक पासबुक, चेकबुक किंवा बॅंक स्टेटमेंट 

कोणत्या इतर योजनांमध्ये गुंतवणूक केलीय त्याचा तपशील

तुम्हाला किती रक्कम भरायची आहे हे तुम्हाला सांगितले जाईल. प्रत्येकाच्या वयोमानानुसार हे बदलत जाईल.