व्वा! वहिणीचा दिरावर जीव जडला, पतीला समजल्यावर त्याने काय केलं? तुम्हीच बघा....

प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही.

Updated: Jul 31, 2021, 03:59 PM IST
व्वा! वहिणीचा दिरावर जीव जडला, पतीला समजल्यावर त्याने काय केलं? तुम्हीच बघा.... title=

मुंबई :  प्रेम कधी कोणावर होईल हे सांगता येत नाही. एकदा जीव जडला की संपला विषय. प्रेमात पडल्यावर जगाचं, आसपासच्या परिस्थितीचं कसलंच भान राहत नाही. प्रेमवीर अगदी प्रेमात वाहून जातात. साधारणपणे आतापर्यंत आपण दिराचा वहिणीवर जीव जडला, असं ऐकत आलोय. पण हा जो काही प्रकार घडलाय, त्यामुळे या सर्व प्रकाराला छेद मिळालाय. इथं वहिणीच आपल्या दिराच्या प्रेमात पडलीय. विशेष म्हणजे लहान चुलत भावाचं आणि बायकोचं हे प्रकरण समजल्यानंतर जे काही घडलंय, ते वाचून तुम्हीही थक्क रहाल. (in jharkhand lachkan village after marriage this man wife had fallen in love her brother in law)  

अजब प्रेम की गजब कहाणी.....

तर झालंय असं की वहिणीचा आपल्या लहान दिरावरच जीव जडला. हा सर्व प्रकार झारखंडमधील गिरीडीहमधील लचकन गावातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोठ्या भावाचं लग्न झाल्यानंतर वहिणीचा दिरावर जीव जडला. लहान भावाचं आणि पत्नीचं एकमेकांच दोघांवर प्रेम असल्याचं मोठ्या विवाहित भावाला समजलं. असं काही भावाला समजल्यानंतर साधारणपणे घरात राडा, फ्री स्टाईल हाणामारी, किंवा बरंच काही घडतं, हे असं आतापर्यंत घडत आलंय. पण हा प्रकार याला अपवाद ठरलाय.

नक्की काय घडलं? 

रिपोर्टनुसार, ही विवाहित महिला गुजरातमधील सुरतेत जाऊन पोहचली. सुरतेत या महिलेचा पती आणि दीर एकत्र काम करायचे पण वेगवेगळे रहायचे. पत्नीने पतीच्या घरी न जाता थेट दिराचंच घर गाठलं. वहिणी आणि दीर दोघंही एकत्र राहू लागले. या दरम्यान या दोघांनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मोठ्या भावाला सर्व प्रकार समजला. भावाने लहान भावाच्या घरी धाव घेतली. 

पुढे काय झालं?

विवाहित भावाने पत्नी आणि लहान भावासोबत या सर्व प्रकरणावर चर्चा केली. यावरुन या दोघांनी आम्हाला एकत्र राहायचंय, असं सांगितलं. त्यानंतर मोठ्या भावाने हा मोठा निर्णय घेतला. दोघांच्या संमतीने विवाहीत भावाने पत्नीसोबत लहान भावाचं लग्न लावून दिलं. या वहिणाला दोन मुलं ही आहेत. सध्या या लग्नाची गावात जोरदार चर्चा आहे.