Government App: आजच स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करा हे अ‍ॅप, सरकारी कामं झटपट लागतील मार्गी

तंत्रज्ञानाच्या युगात आता सरकारी कार्यालयं आपल्या स्मार्टफोनमध्ये आलेत, असं म्हणायला हरकत नाही.

Updated: Sep 11, 2022, 07:07 PM IST
Government App: आजच स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करा हे अ‍ॅप, सरकारी कामं झटपट लागतील मार्गी title=

Important Government Apps: सरकारी काम म्हटलं की डोक्याला घाम फुटतो. कारण सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार, अशी काही भावना असतो. कारण सरकारी कामं करताना जास्त वेळ लागतो. पण तंत्रज्ञानाच्या युगात आता सरकारी कार्यालयं आपल्या स्मार्टफोनमध्ये आलेत, असं म्हणायला हरकत नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत लोकांना आपले सरकारी काम करण्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. परंतु आता तसे नाही आणि आता स्मार्टफोनच्या मदतीने घरी बसून तुमची कामे सहज करता येतात.  यासाठी तुम्हाला काही सरकारी अ‍ॅप्स डाउनलोड करावे लागतील. आज आम्ही तुम्हाला अशाच सरकारी अ‍ॅप्सबद्दल सांगणार आहोत.

mParivahan: रस्ते वाहतूक आणि वाहन विभागाशी संबंधित सरकारी कामे करण्यासाठी हे अ‍ॅप सर्वोत्तम आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी तारीख, नोंदणी प्राधिकरण, वाहनाचे वय, वाहन वर्ग, विमा वैधता, फिटनेस वैधता इत्यादीसाठी तुम्ही हे अ‍ॅप वापरू शकता. या अ‍ॅपमुळे तुम्हाला सरकारी कार्यालयांच्या फेऱ्याही माराव्या लागणार नाहीत.

mPassport Seva: तुम्हाला पासपोर्ट घ्यायचा असेल किंवा त्याच्याशी संबंधित इतर सेवांचा लाभ घ्यायचा असेल, तर mPassport अ‍ॅपचा तुम्हाला खूप उपयोग होईल. त्याच्या मदतीने तुम्ही पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता, तसेच इतर अनेक सेवांचा लाभ घेऊ शकता. या अ‍ॅपचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर त्याचा वापर करून तुमचे काम सोपे करू शकता.

MyGov App: MyGov अ‍ॅप हे एक अतिशय लोकप्रिय अ‍ॅप आहे जे 2014 पासून सुरू झाले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमची अनेक सरकारी कामे पूर्ण करू शकता. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सरकारी योजना आणि त्यांचे फायदे जाणून घेऊ शकता. सरकारला सूचनाही देऊ शकता. हे अ‍ॅप भारतीयांना थेट सरकारशी जोडण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही देखील या अ‍ॅपला भेट देऊ शकता आणि माहिती मिळवू शकता ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल.