'या' राज्यात बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचे आदेश, जनआंदोलनांच्या धड्यांतही बदल

UP Government on Mughal History: इतक्या वर्षांचा इतिहास दुर्लक्षित राहतोय... मुघल शासकांचे धडेच अभ्यासक्रमातून गायब. नव्या अभ्यासक्रमात नेमकं काय असेल? शासन निर्णयानंतर एकच चर्चा... विरोधक आक्रमक होणार!   

Updated: Apr 4, 2023, 04:33 PM IST
'या' राज्यात बारावीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचे आदेश, जनआंदोलनांच्या धड्यांतही बदल title=
big change Mughal History removed from UP education for Classes 12 latest Marathi news

Mughal History in UP Education : शालेय आणि महाविद्यालयीन दिवसांमध्ये इतिहासाच्या अभ्यासक्रमात काही विषय सातत्यानं त्यांच्या महत्त्वानुसार आपल्या वाचनात येत असतात. अभ्यासक्रमाचाच भाग म्हणून या विषयांकडे आपण, तितक्याच गांभीर्यानं पाहतो. भूतकाळात घडलेल्या आणि इतिहासात नमूद असणाऱ्या या घटनांमध्ये मुघल आणि त्यांना विस्तृत साम्राज्याबाबतही बरंच लिहिलं, वाचलं गेलं आहे. पण, यापुढे मात्र चित्र बदललेलं असेल. कारण ठरत आहे एक महत्त्वाचा निर्णय. 

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारनं घेतलेल्या निर्णयानुसार आता राज्यात विद्यार्थ्यांनामुघल इतिहास शिकवला जाणार नाही. इयत्ता 12 वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा निर्णय उत्तर प्रदेश बोर्ड आणि CBSE बोर्डाला लागू असेल. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात 2023- 24 या शैक्षणिक वर्षासाठी अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदलही करण्यात आले असून, इतिहाच्या पाठ्यपुस्तकातून काही धडे वगळण्यात आले आहेत. (big change Mughal History removed from UP education for Classes 12 latest Marathi news)

इतकंच नव्हे, तर इयत्ता अकरावीच्या इतिहास विषयाच्या पाठ्यपुस्तकातून इस्लामचा उदय, औद्योगिक क्रांती, संस्कृतींमधील वाद असे धडेही वगळण्यात आले आहेत. तर, नागरिकशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातून शीतयुद्ध आणि अमेरिकेचे वर्चस्व हे धडे वगळण्यात आले आहेत. 

हेसुद्धा पाहा : IPL 2023 : ए माराsss! मराठमोळ्या ऋतुराजचा फिल्मी स्टाईल षटकार; कारवर पडला खड्डा 

 

सूत्रांच्या माहितीनुसार  (NCERT) चे इयत्ता बारावीचे विद्यार्थी यापुढे मुघल शासकांविषयी माहिती अभ्यासक्रमातून माहिती मिळवू शकत नाहीत. त्यांच्या पुस्तकांचून  'अकबरनामा' (अकबराचा शासनकाळ आणि तत्सम माहिती), 'बादशाहनामा' (शहाजहाँचा शासनकाळ आणि तत्सम माहिती) हे धडे वगळले गेले आहेत. तर, नागरिकशास्त्रामध्ये जन आंदोलनांचा उदय आणि एक पक्ष एक नेतृत्त्व या आधारांवरील धड्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत. 

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी माहिती देत आपण विद्यार्थ्यांना एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून शिकवलं जात असून, त्यांनी केलेल्या बदलांचं पालन केलं जाईल असं स्पष्ट केलं. मोदी सरकारकडून यापूर्वीही मुघलांना अनुसरून असणाऱ्या अनेक ठिकाणांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला होता. याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्ष भाजपला घेरणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.