Yami Gautam आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन; मुलाचं नाव सांगते म्हणाले...

Yami Gautam Gave Birth to Baby Boy : यामी गौतम आणि आदित्य धरच्या घरी राजकुमाराचे आगमन, मुलाला दिलं 'हे' खास नाव

दिक्षा पाटील | Updated: May 20, 2024, 12:17 PM IST
Yami Gautam आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन; मुलाचं नाव सांगते म्हणाले... title=
(Photo Credit : Social Media)

Yami Gautam Gave Birth to Baby Boy : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत होती. यामी गौतमीनं मुलाला जन्म दिला आहे. यामी आणि तिचा नवरा आदित्य धरनं ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिनं पोस्ट शेअर करत त्यांच्या मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. 

यामी आणि आदित्यनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांची डॉक्टर्स आणि मीडियाचे आभार मानले आहे. त्यासोबत मुलाचं नाव देखील सांगितलं आहे. यामी आणि आदित्यनं या पोस्टमध्ये पौराणिक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये माता आणि तिचं मुलं असे एक सुंदर चित्र दिसत आहे. तर त्या फोटोत त्यांनी मुलाच्या नावाचा खुलासा करत सांगितले की "आमच्या मुलाच्या जन्माची आनंदाची बातमी शेअर करताना आम्हाला आनंद होतोय. यामी आणि आदित्यनं त्यांच्या मुलाचं नाव वेदाविद ठेवलं आहे. तर पुढे त्यांनी सांगितलं की वेदाविदचा जन्म हा अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला आहे. त्याच्यावर तुमचा आशीर्वाद कायम राहुद्या" असं त्यांनी म्हटलं आहे. याचा अर्थ वेदाविदचा जन्म हा 10 मे रोजीच झाला आहे. त्याच्या 10 दिवसानंतर त्यांनी आता ही गोड बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वेदाविदचा अर्थ!

वेदाविद हे एक संस्कृत नाव असून वेदा आणि विद असं मिळून ठेवण्यात आलं आहे. तर त्याचा अर्थ आहे की वेदांची माहिती असलेला. तर हे विष्णू देवाचं देखील नाव आहे. 

हेही वाचा : 'आपल्या भाषेची लाज वाटते का?' कियारा आडवाणीचं Cannes मधील इंग्रजी ऐकूण नेटकरी चक्रावले

दरम्यान, यामी आणि आदित्यची पोस्ट पाहिल्यानंतर सेलिब्रिटींनीपासून नेटकऱ्यांपर्यंत सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामी आणि आदित्यनं 4 जून 2021 शी लग्न केलं. त्या दोघांनी कुटुंब आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न केलं होतं. लग्नाच्या 3 वर्षानंतर यामी आणि आदित्यच्या घरी पाळणा हलला आहे. त्या दोघांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर यामी सगळ्यात शेवटी आर्टिकल 370 मध्ये दिसली. तिच्या या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. तर आदित्य हा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे.