VIDEO : ऐका दीपिकाला रणवीरने दिलेलं खास नाव

आँखे सबसे खुबसूरत इसकी....

Updated: Feb 21, 2019, 02:11 PM IST
VIDEO : ऐका दीपिकाला रणवीरने दिलेलं खास नाव title=

मुंबई : कलाविश्वातील तुमची आवडती जोडी कोणती असा प्रश्न विचारला असता एकाच नावाला अनेकांची पसंती असते. ते नाव म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या जोडीचं. एका चित्रपटाच्या निमित्ताने सुरु झालेला त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाला २०१८ मध्ये एक नवं वळण मिळालं. ते वळण होतं लग्नाचं. नात्याची अधिकृत घोषणा करत रणवीर आणि दीपिकाने अतिशय दिमाखदार सोहळ्यात लग्नगाठ बांधत पुन्हा एकदा अनेकाची मनं जिंकली. 

अनेक दिवसांच्या सुट्टीनंतर ही जोडी पुन्हा एकदा कामावर रुजू झाली. पण, विविध कार्यक्रम म्हणू नका किंव मुलाखतींची सत्र म्हणू नका. 'दीप-वीर'ला त्यांच्या नात्याविषयी विचारण्यात येणारे प्रश्न काही अद्यापही थांबलेले नाहीत. नुकतच रणवीर त्याच्या 'गली बॉय' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एका मुलाखत सत्रात सहभागी झाला होता. तेव्हा अभिनेत्री आलिया भट्टही त्याच्यासोबत होती. या मुलाखतीदरम्यान आलिया आणि रणवीरसोबत एक खेळ खेळण्यात आला. ज्यामध्येच दीपिकाला दिलेल्या खास नावाचा उल्लेख रणवीरने केला. 

व्यक्तीओळख सांगणाऱ्या काही ओळी यावेळी आलिया म्हणाली. 'दीदी मेरी, भाभी इसकी, आँखे सबसे खुबसूरत इसकी', असं आलिया म्हणाली. तिच्या या ओळी ऐकून रणवीरने क्षणार्धाचाही विलंब न लावता 'ये तो मेरी वाली है!', असं उत्तर दिलं. आलियाने यावर त्याला तिचं नाव विचारलं. आलियाच्या या प्रश्नाला उत्तर देत रणवीर म्हणाला, 'मिसेस रणवीर सिंग'. त्यावर पुन्हा तिच्या पूर्ण नावाची विचारणा करण्यात आली, ज्याचं उत्तर देत रणवीर मोठ्या गर्वाने म्हणाला, 'मिसेस दीपिका रणवीर सिंग भवनानी पदुकोण'. दीपिकाचं हे नाव आणि रणवीरने ते ज्या पद्धतीने घेतलं आहे, त्यावरुन केमिस्ट्रीच्या बाबतीत ही जोडी नेमकी का, इतरांना मागे टाकते हेच पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.