VIDEO : रणबीरचा विषय निघताच आलियाने अशी प्रतिक्रिया दिली की...

आलिया म्हणते.... 

Updated: Jan 10, 2019, 10:13 AM IST
VIDEO : रणबीरचा विषय निघताच आलियाने अशी प्रतिक्रिया दिली की...  title=

मुंबई : 'गली बॉय' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यावेळी चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेता रणवीर सिंग, आलिया भट्ट यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर रणवीर आणि आलियाने माध्यमांशी संवाद साधत चित्रपटाविषयीच्या प्रश्नांची उत्तरं दिली. प्रश्नोत्तराच्या याच सत्रात एका पत्रकाराने आलियाला रणबीरविषयीचा एक प्रश्न विचारला. 

गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या रिलेशनशिपच्या बऱ्याच चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे 'मौका भी है और दस्तूर भी....' असं म्हणत आणि संधी साधत पत्रकाराने आलियाला 'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीरसोबत आणि 'गली बॉय'मध्ये रणवीरसोबत काम करण्याविषयीच्य़ा अनुभवाविषयीचा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत ''दोघांमध्येही साम्य खूप आहे, वेगळेपण इतकच आहे की एकासोबत मी 'ब्रह्मास्त्र'मध्ये काम करत आहे आणि एकासोबत 'गली बॉय'मध्ये', असं म्हणत आलियाने या प्रश्नाचं थोडक्यातच उत्तर देत आवरतं घेण्याचा प्रयत्न केला. पण, रणवीर तिथे असताना कशी बरं तिची सुटका होणार? 

आलियाचं उत्तर ऐकताच रणवीरने तिची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं. आलियाचं उत्तर संपत नाही तोच, 'एक तिच्यासाठी जास्त खास आणि जवळचा आहे तर एक कमी असं वक्तव्य केलं'. त्याचं हे विधान ऐकून आलियाने स्मितहास्य देत ती काहीशी लाजल्याचं पाहायला मिळालं. ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी पोहोचलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींनीसुद्धा रणबीरचा उल्लेख येताच आलियाच्या चेहऱ्यावर खुलेलं ते स्मितहास्य पाहिलं आणि पुन्हा एकदा ही सेलिब्रिटी जोडी चर्चेचा विषय ठरली. 

आलिया आणि रणबीर आता बऱ्याच कार्यक्रमांना आणि कौटुंबीक समारंभांना एकत्र हजेरी लावतात. मुख्य म्हणजे यंदाच्या वर्षी ते लग्नगाठ बांधण्याच्या बेतात असल्याचंही म्हटलं जात आहे.  त्यामुळे आता खरंच ते लग्नाची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांमध्ये करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.