अनुष्का रात्री उशिरा इटलीसाठी रवाना, पुन्हा चर्चांना आला ऊत

बॉलीवूड आणि क्रीडा जगतात सध्या एकच विषय चर्चेत आहे तो म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे लग्न. हे दोघंही १२ डिसेंबरला इटलीमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा मीडियामध्ये सुरु आहे. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 8, 2017, 09:22 AM IST
अनुष्का रात्री उशिरा इटलीसाठी रवाना, पुन्हा चर्चांना आला ऊत title=

मुंबई : बॉलीवूड आणि क्रीडा जगतात सध्या एकच विषय चर्चेत आहे तो म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे लग्न. हे दोघंही १२ डिसेंबरला इटलीमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा मीडियामध्ये सुरु आहे. 

अनुष्का कुटुंबियांसह इटलीला रवाना

बुधवारी जेव्हा अनुष्का आणि विराटच्या लग्नाची चर्चा सुरु होती तेव्हा अनुष्काच्या मॅनेजरने या वृत्ताचे खंडन केले होते. यादरम्यानच अनुष्का रात्री उशिरा आपल्या आईवडिलांसह इटलीला रवाना झाल्याने लग्नाच्या या चर्चेला अधिकच ऊत आलाय. 

इटली जाण्यावरुन उपस्थित होतायत सवाल

जर लग्नाच्या बातमीचे खंडन करण्यात आलेय तर अनुष्का कुटुंबियांसह इटली का जातेय? असं काय आहे की संपूर्ण कुटुंब इटलीला रवाना झालंय? असे सवाल उपस्थित होतायत. 

 

मुंबई एअरपोर्टवरील अनुष्काचा कुटुंबियांसोबत जातानाच व्हिडीओ व्हायरल होतोय. सूत्रांच्या मते अनुष्का आणि विराट १२ ते १५ डिसेंबरदरम्यान इटलीमध्ये लग्न करतायत. अनुष्कासोबत एअऱपोर्टवर तिचे वडील अजय कुमार शर्माही दिसले. तसेच तिची आई आशिमा शर्माही दिसल्या.