Rashmika Mandanna सोबत Vijay Deverakonda एकत्र? Instagram Live मुळे पोलखोल

Rashmika Mandanna नाच्या या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा तिच्या आणि Vijay Deverakonda च्या रिलेशनशिपची पोलखोल झाली आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते हे कोणापासून लपवू शकत नाही. 

Updated: Jan 5, 2023, 01:13 PM IST
Rashmika Mandanna सोबत Vijay Deverakonda एकत्र? Instagram Live मुळे पोलखोल title=

Vijay Deverakonda and Rashmika Mandanna In Instagram Live : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो. मात्र, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी अजून या बातमीवर दुजोरा दिलेला नाही. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा मालदीवमधला एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या. दरम्यान, आता रश्मिकाचं एक लाइव्ह व्हायरल झालं असून त्यात नेटकऱ्यांना विजयचा आवाज आला आहे. 

रश्मिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 31 डिसेंबर 2022 रोजी लाइव्ह करत चाहत्यांशी संपर्क साधला होता. यावेळी रश्मिका एकटी दिसत असली तरी देखील त्या इन्स्टा लाइव्हमध्ये नेटकऱ्यांना विजयचा आवाज ऐकायला मिळाला असे त्यांचे म्हणणे आहे. त्या लाइव्हमधून विजयचा आवाज येत असल्याचे म्हणतं नेटकऱ्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत रश्मिकाच्या लाइव्हमध्ये विजयचा आवाज येतोय तर आता या दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्या या खऱ्या असल्याचे म्हणणे आहे. (Vijay Deverakonda and Rashmika Mandanna In Relationship)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या आधी रश्मिका आणि विजयचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दोघेही मालदीवमध्ये न्यू ईयर सेलिब्रेशन करण्यासाठी गेल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. रश्मिका आणि विजयनं मालदीवमधील एकाच जागी उभा राहून हा फोटो काढल्याचे म्हटले जात आहे. कारण त्या दोघांच्या फोटोचं बॅकग्राऊंड एकसारखं आहे. 

या दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांनी चाहते आनंदी झाले आहेत. इतकंच नाही तर त्या दोघांनी लवकरच त्यांच्या रिलेशनशिपविषयी जाहिर करावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. प्रेक्षकांना त्यांना फक्त खासगी आयुष्यात नाही तर मोठ्या पडद्यावरही एकत्र पाहायचे आहे. 

हेही वाचा : तो पारशी; ती मराठमोळी... अभिनेत्याला लग्नाच्या वाटेत वाढत्या वयाचा नाही आला अडथळा

रश्मिका आणि विजयनं याआधी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. याशिवाय कॉफि विथ करणमध्ये एका एपिसोडमध्ये विजयनं हजेरी लावली होती. त्यावेळी रश्मिकाविषयी प्रश्न विचारता विजय म्हणाला, आमचं खूप चांगलं बॉन्ड आहे. रश्मिका ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्यावेळी देखील त्यानं त्याच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला नाही. 

रश्मिका लवकरच रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता थलपथी विजयसोबत 'वारिसू' या चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहे. तर विजय देवरकोंडा हा पॅन इंडिया अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'जन गण मन' मध्ये दिसणार आहे.