भाऊ कदमच्या आवाजात विद्या बालनची तूफान कॉमेडी; 'ऐका हो ऐका' VIDEO पाहिलात का?

Vidya Balan Bhau Kadam Comedy: विद्या बालनची (Vidya Balan Speaking in Marathi) अनेकदा जोरात चर्चा रंगलेली असते आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या अशाच एका सोशल मीडियावरही तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिचा एक तूफान कॉमेडी व्हिडीओ हा व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 16, 2023, 05:16 PM IST
भाऊ कदमच्या आवाजात विद्या बालनची तूफान कॉमेडी; 'ऐका हो ऐका' VIDEO पाहिलात का? title=
vidya balan bhau kadam voice comedy video in marathi goes viral on instagram trends

Vidya Balan: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यात सेलिब्रेटीचेही व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. सध्या इन्टाग्रामवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. विद्या बालन ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड एक्टिव असते. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या अशाच एका हटके व्हिडीओची ज्यात तिचा मराठमोळा, हटके बाज पाहायला मिळतो आहे. त्यामुळे तिच्या या व्हिडीओनं सर्वांनाच पोटभरून हसवलं आहे.

या व्हिडीओत तुम्हाला भाऊ कदम यांचा आवाज ऐकायला येईल. 'फू बाई फू' या मराठी विनोेदी मालिकेतील एक भाग विद्या बालननं व्हिडीओतून सादर केला आहे. ज्यात एक तूफान कॉमेडी अनुभवायला मिळते आहे. यात विद्यानं लाल रंगाची साडी घातलेली दिसते आहे. सोबतच कपाळाला टिकली आणि आंबाडा बांधला आहे. 

हेही वाचा : पहिल्या चित्रपटात कशी दिसायची ऐश्वर्या? 14 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत केला होता रोमान्स

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चेही असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात आणि ते सोशल मीडियावर डब करून तूफान व्हायरल केले जातात. 2010 सालापासून 'फू बाई फू' ही विनोदी मालिका सुरू होती. त्यात स्वप्नील जोशी आणि निर्मिती सावंत हे दोघं परीक्षक होते. त्यानंतर स्वप्निल जोशी आणि अश्विनी काळसेकर याही परीक्षक म्हणून होत्या. अशाच एका पर्वातला हा सीन आहे. ज्यात भाऊ कदम आणि सुप्रिया पाठारे यांची तूफान कॉमेडी होती. त्यातलच एक सीन विद्या बालननं आपल्या अभिनयानं हीट केला आहे. चला तर मग पाहुया की नक्की विद्याच्या या कॉमेडी व्हिडीओत असं नक्की आहे तरी काय? तुम्हीही हा व्हिडीओ पाहून नक्कीच प्रचंड हसल्याशिवाय राहणार नाहीत. 

तुम्हाला माहितीच आहे की विद्या बालन ही मराठी चित्रपटांवर आणि कलाकारांवरही खूप प्रेम करते. तिचे मराठीवरही प्रेम आहे. तिनं 'एक अलबेला' नावाचा मराठी चित्रपटही केला होता. मंगेश देसाई यांच्यासमवेत तिनं हा चित्रपट केला होता. भगवानदादा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा चित्रपटही प्रचंड गाजला होता. त्यासोबतच तिनं 'फेरारी की सवारी' या चित्रपटातूनही तिनं 'मला जाऊ द्या, मुझे जाने दे' ही लाल रंगाच्या नववारीतील लावणी केली होती. या गाण्याचीही प्रचंड चर्चा रंगलेली होती. आता तिच्या या व्हिडीओनंही सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.