फिटनेस ट्रेनरला प्रभासकडून महागडं गिफ्ट; पाहून व्हाल थक्क

एक व्यक्ती म्हणून ... 

Updated: Sep 6, 2020, 04:38 PM IST
फिटनेस ट्रेनरला प्रभासकडून महागडं गिफ्ट; पाहून व्हाल थक्क  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता prabhas प्रभास हा त्याच्या अभिनयासोबतच व्यक्तीमत्त्वासाठीही ओळखला जातो. एक व्यक्ती म्हणून प्रभासचं वावरणं, त्याचं इतरांप्रती आदरानं वागणं, बोलणं, सर्वांशी मिळून मिसळून राहणं हे अनेकांचं मन जिंकतं. असा हा अभिनेता पुन्हा एकदा त्याचं वेगळेपण सिद्ध करुन गेला आहे. 

Mr World 2010 चा किताब पटकवरणाऱ्या लक्ष्मण रेड्डी याच्यासाठी ही बाब अतिशय खास ठरत आहे. प्रभासचा फिटनेस ट्रेनर असणाऱ्या लक्ष्मणनं आजवर प्रभासच्या पिळदार आणि भारसस्त शरीरय़ष्टीसाठी त्याची फार मदत केली आहे. अशा या खास व्यक्तीसाठी प्रभासनं असं काही केलं, ती चाहत्यांनी पुन्हा एकदा या अभिनेत्याची वाहवा करण्यात सुरुवात केली आहे. 

आभार व्यक्त करण्यासाठी म्हणून प्रभासनं त्याच्या या ट्रेनरला एक लक्झरी कार भेट म्हणून दिली आहे. प्रभासच्याच एका फॅनपेजवरुन या क्षणांचे फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये लक्ष्मण आणि त्याचे कुटुंबीय दिसत आहेत. सोबत प्रभासही रेंज रोव्हर या आलिशान कारपुढं उभा दिसत आहे. प्रभासनं दिलेली ही भेट खऱ्या अर्थानं लक्ष्मणसाठी ग्रेट आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

 

दरम्यान, या लोकप्रिय अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाविषयी सांगावं तर येत्या काळात तो 'राधे श्याम', या चित्रपटातून झळकणार आहे. अभिनेत्री पूजा हेगडे हिच्यासोबत तो चित्रपटात स्क्रीन शेअर करेल. याशिवाय काही दिवसांपूर्वीच त्यानं आणखी एका चित्रपटाबाबतही माहिती दिली. ओम राऊतच्या दिग्दर्शनात साकारल्या जाणाऱ्या 'आदिपुरुष', या चित्रपटातूनही प्रभास झळकणार आहे.