“इंग्रज ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी....”, नेटकऱ्याच्या या कमेंटवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Shweta Mehendale Video : अभिनेत्री श्वेता मेहंदळे ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. ती सतत तिच्या युट्यूब अकाऊंटवरून रोड ट्रिपचे व्हिडीओ शेअर करत राहते आणि तिचे हे व्हिडीओ चांगलेच चर्चेत राहतात. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 7, 2023, 12:17 PM IST
“इंग्रज ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी....”, नेटकऱ्याच्या या कमेंटवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर title=
(Photo Credit : Social Media)

Shweta Mehendale Video : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' मधील अभिनेत्री श्वेता मेहंदळे ही चांगलीच लोकप्रिय आहे. श्वेता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. श्वेता तिचे फिरतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. श्वेताचे बाईक राईडचे व्हिडीओ पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात.   

श्वेतानं काही दिवसांपूर्वी तिच्या कोकण दौऱ्याचा एक व्लॉग युट्यूबवर शेअर केला होता. तिचा हा व्लॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. इतकंच काय तर श्वेतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देखील तिनं हा व्लॉग शेअर केला होता. तिचा हा व्लॉग फक्त व्हायरल झाला नाही तर त्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. अनेकांना तिचा हा व्लॉग प्रचंड आवडल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण म्हणताता ना कुठे तरी काही तरी कितीही चांगल असलं तरी काही तरी वाईट बोलायची लोकांना सवय असते. असंच काही तरी श्वेतासोबत झालं आहे. श्वेतानं शेअर केलेल्या या व्लॉगवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे. त्या कमेंटनं सगळ्यांचे लक्ष वेधलं असून श्वेतानं त्या व्यक्तीला सडेतोड उत्तर दिले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

श्वेताच्या या व्लॉगवर कमेंट करत हा नेटकरी म्हणाला, “इंग्रज भारतातून जाताना ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी आपली औलाद म्हणून सोडून गेले” ही कमेंट वाचताच श्वेतानं त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दित श्वेता म्हणाली "तुमचे हे विचार आहेत? आणि ही भाषा आहे?” श्वेतानं या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा स्क्रिनशॉर्ट देखील व्हायरल होत असून नेटकरी प्रतिक्रिया दिली आहे. 

Shweta Mehendale kokan bike ride Video netizen comment got her angry know in detail

हेही वाचा : Ranveer Singh च्या वाढदिवसानिमित्तानं दीपिकाची एकही पोस्ट नाही? चाहते संभ्रमात...

श्वेताचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 252K फॉलोवर्स आहेत. तर तिच्या युट्यूब अकाऊंटवर 16.7K सबस्क्रायबर्स आहेत. श्वेताच्या या सगळ्या व्हिडीओला प्रचंड व्ह्युअस आहेत. श्वेताच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत रेवती ही भूमिका साकारली होती. या पलिकडेच श्वेताचे अनेक इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ देखील व्हायरल होतात. तिच्या या फनी व्हिडीओ तिचे चाहते प्रतिक्षा करताना दिसतात.