मला घटस्फोट हवा; मुलाच्या जन्मानंतर भारतीकडे पतीची धक्कादायक मागणी

या साऱ्यामध्येच भारतीला धक्का बसत आहे. कारण ठरतोय तो म्हणते तिचा पती, हर्ष लिंबाचिया. 

Updated: May 28, 2022, 10:46 AM IST
मला घटस्फोट हवा; मुलाच्या जन्मानंतर भारतीकडे पतीची धक्कादायक मागणी  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मुलाच्या जन्मानंतर विनोदी कलाकार भारती सिंग (Bharti Singh) पुन्हा एकदा तिचं आयुष्य पूर्वपदावर आणत आहे. प्रसूतीच्या दिवसापर्यंत कामात रमलेली भारती बाळ जन्माला आल्यानंतर फार कमी दिवस सुट्टीवर होती. ज्यानंतर आता ती पुन्हा एकदा कामाला लागली आहे. इतकंच नव्हे, तर तिनं लेकाला घेऊन प्रवासालाही सुरुवात केली आहे. पण, या साऱ्यामध्येच भारतीला धक्का बसत आहे. कारण ठरतोय तो म्हणते तिचा पती, हर्ष लिंबाचिया. (Haarsh Limbachiyaa). 

म्हणे आता भारतीचा पती तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करतोय. बसला ना धक्का? एकाएकी त्यांच्या नात्यात असं काय घडलं, की तो घटस्फोट मागतोय? तुम्हालाही हेच प्रश्न पडत आहेत ना? (shocking news Haarsh Limbachiyaa wants divorce from wife comedian Bharti Singh)

हे सर्व तुम्हाला एका व्हिडीओतून लक्षात येईल. बरं, चिंता करण्याचं कारण नाही. कारण ही बाब तितकी गंभीर नाही. कामाच्या व्यापातून वेळ काढत भारती आणि तिचा पती, गोव्याला गेली आहे. 

जिथं लग्न झालं, त्याच रिसॉर्टवर भारती आणि हर्ष पोहोचले. आपल्या मुलाची पहिली सहल तिथेच असायला हवी, जिथून आपण आपल्या नात्याची सुरुवात केली याच भावनेने भारती आणि हर्षनं गोवा गाठलं. 

अतिशय खास अशा या सहलीचा व्हिडीओ भारतीनं युट्यूबवर शेअर केला. या व्हिडीओध्ये भारती हेसुद्धा सांगताना दिसत आहे, की तिच्या हाऊस हेल्पर आणि जापाचे बरेच वाद असतात. हर्षही तिथे घरात हाऊस हेल्पर आणि भारतीमुळं डोक्याला हात लावून असतो. 

आधीच त्याला हाऊस हेल्पर आणि भारतीचा त्रास (विनोदी अंदाजात) होता. त्यातच आता आणखी एक महिला... झालंच मग कल्याण. ही सर्व परिस्थिती पाहता हर्षनं मला या दोघींपासून घटस्फोट हवा आहे असं म्हणताना दिसत आहे. अतिशय मजेशीर असा हा व्हिडीओ हर्षच्या या एका डायलॉगमुळे बराच गाजत आहे.