प्रसिद्ध कॉमेडियनवर का आली रस्त्यावर कपडे धुण्याची वेळ? कपिलच्या शोमध्येही केलंय काम

हा प्रसिद्ध कॉमेडियन एकेकाळी कपिल शर्माच्या शोचा जीव होता. त्याच्या कॉमेडीचं खूप कौतुक केलं जायचं. त्याचे वन लाइनर्स पंच अप्रतिम असायचे. पण नंतर असं काही घडलं ज्यामुळे त्याने कपिल शर्माच्या कॉमेडी शोला अलविदा केला. आता हा अभिनेता शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटातही दिसणार आहे. पण या प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला कपडे धुताना दिसत आहे.

Updated: Sep 1, 2023, 04:02 PM IST
प्रसिद्ध कॉमेडियनवर का आली रस्त्यावर कपडे धुण्याची वेळ? कपिलच्या शोमध्येही केलंय काम title=

मुंबई : कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमीच तो सोशल मीडियावर त्याच्या आयुष्यात काय चाललं आहे याविषयी पोस्ट शेअर करत असतो. मात्र सध्या अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टवरुन युजर्स असा अंदाज लावतायेत की, त्याने सिनेसृष्टीतून एक्झिट घेतली की काय? समोर आलेल्या व्हिडीओत अभिनेता धोबी काम करताना दिसत आहे. अभिनेत्याच्या सा पोस्टमुळे सध्या खळबळ उडाली आहे. 

हा प्रसिद्ध कॉमेडियन एकेकाळी कपिल शर्माच्या शोचा जीव होता. त्याच्या कॉमेडीचं खूप कौतुक केलं जायचं. त्याचे वन लाइनर्स पंच अप्रतिम असायचे. पण नंतर असं काही घडलं ज्यामुळे त्याने कपिल शर्माच्या कॉमेडी शोला अलविदा केला. आता हा अभिनेता शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटातही दिसणार आहे. पण या प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला कपडे धुताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूपच अप्रतिम आहे. बरं, हा अभिनेता बऱ्याच काळापासून त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर असेच व्हिडिओ शेअर करत आहे.

शेअर केलेला हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठीचा आहे.  सुनिल ग्रोव्हरने शेअर केलेला हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठीचा आहे. कॉमेडियन (comdedian) आणि अभिनेता सुनिल ग्रोवर (sunil grover) आपल्या फॅन्सचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर दुसरीकडे सुनिल सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर करतो ज्यामुळे लोकांना हसू आवरता येत नाही. आता सुनिल ग्रोवरने सोशल मीडिया (social media) वर एक नवी पोस्ट शेअर केली आहे जी पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाहीये. असाच काहीसा हा व्हिडीओ आहे.

अभिनेता सुनील ग्रोव्हरने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'माझं आवडतं काम करत आहे.' याचबरोबर सुनील ग्रोव्हर या व्हिडिओमध्ये कपडे धुताना दिसत आहे. धोपाटण्याने कपडे धुत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून अनेक कमेंट येत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुनील ग्रोवरचं वर्कफ्रंट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर, सुनील ग्रोव्हर शेवटचा गुडबाय (goodbye) चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने अमिताभ बच्चन (amitabh bacchan), रश्मिका मंदान्ना (rashmika manddana) आणि नीना गुप्ता (neena gupta) यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. सुनील ग्रोव्हरने पंडितजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या कामाचं खूप कौतुकही झालं होते. याआधी 2021 मध्ये सुनील ग्रोव्हरची तांडव (tandav) ही वेब सिरीज रिलीज झाली होती. आता लवकरच तो शाहरुखच्या जवान सिनेमात झळकणार आहे.