रूपाली भोसलेला चक्क हवाई सुंदरीकडून मिळालं खास गिफ्ट! अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी...

Rupali Bhosale : कलाकारांना त्यांचे फॅन्स कधी कुठल्या रूपात भेटतील याचा त्यांचा काहीच थांगपत्ता नसतो. कधी फॅन्स इतके अचानक भेटतात की त्यांनाही त्याचा थांगपत्ता लागत नाही. सध्या अशाच एका अभिनेत्री बाबत असंच काहीसं घडलं आहे. 

Updated: Oct 25, 2023, 08:28 PM IST
रूपाली भोसलेला चक्क हवाई सुंदरीकडून मिळालं खास गिफ्ट! अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी...  title=
rupali bhosale gets special gift from cabin crew while traveling from fight

Rupali Bhosale : आपल्याला आपल्या प्रवासात अनेक माणसं भेटतात. त्यातून आपला कोणीतरी चाहता जरा का आपल्याला आपल्या प्रवासात मिळाला तर? सध्या असंच काहीसं एका अभिनेत्रीसोबतही घडलं असून तिला तिच्या फॅननं चक्क विमानातून एक खास भेट दिली आहे. ही अभिनेत्री दूसरी तिसरी कोणी नसून ती आहे अभिनेत्री रूपाली भोसले म्हणजेच तुमची लाडकी संजना. 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या सर्वत्र गाजते आहे. त्यामुळे या मालिकेची सध्या सर्वत्रच चर्चा आहे. सोशल मीडियावरही ही मालिका सतत चर्चेत असते. या मालिकेवरून मीम्सही फिरत असतात. संजना, अरूंधती, अनिरूद्ध ही पात्र प्रेक्षकांच्या चर्चेत असतात. त्यातून संजना हे पात्रंही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. रूपालीनं नुकताच विमानप्रवास केला होता. तेव्हा तिला तिची एक फॅन भेटली आणि तिनं तिला खास भेटही दिली. 

एका नामांकित एअरलाईन्सच्या केबिन क्रुनं रूपालीसाठी एक खास भेट आणि संदेश दिला आहे. यावेळी रूपालीनं आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे त्याची चर्चा आहे. यावेळी तिच्या या पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 2019 पासून ही मालिका सुरू आहे. ही मालिका आज सर्वात जास्त लोकप्रिय आहे. संजना ही या मालिकेतील नकारात्मक पात्र होतं परंतु आता संजना ही सर्वांनाच आवडते आहे. त्यामुळे तिचीही बरीच चर्चा असते. सध्या या पोस्टमध्ये तिनं काय लिहिलंय हे पाहूयात. 

हेही वाचा : लहान मुलीसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? लग्नानंतर करिअरमधून घेतला ब्रेक

''हे खूप आश्चर्यकारक आहे. आजपर्यंत बॉलीवूड सेलिब्रिटीचे असे फोटो किंवा केबिन क्रू त्यांच्याबरोबर फोटो काढतात. त्यांना काहीतरी गिफ्ट देतात; असे फोटो पाहिले होते. पण आज जेव्हा माझ्याबरोबर हे घडलं तेव्हा खरंच खूप छान वाटलं. का माहिती नाही पण डोळे पाणावले. थोडी भावूक झाले. पण चेहऱ्यावर एक अलगद एक स्माइल आली.'' असं कॅप्शन तिनं आपल्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टनं लक्ष वेधलं आहे. यावेळी तिनं त्या चाहतीनं तिला लिहिलं पत्र आणि दिलेल्या भेटीचा फोटोही शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या केबिनक्रुनं तिला एक चॉकलेट आणि खास पत्र दिलं होतं. या पत्रात तिने लिहिलं, ''हॅलो रुपाली, आमच्यासोबतचा विमान प्रवास सुखाचा होवो ही अपेक्षा. मी तुझ्या 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना या पात्राची खूप मोठी चाहती आहे. तू तुझी भूमिका ज्या पद्धतीने पार पाडतेस हे मला फारच आवडतं. तुझं मालिकेतील हसू मला खूप आवडतं. पुन्हा भेटू. नक्की.''