मेट गालासाठी रणवीर परफेक्ट - दीपिका पादुकोन

Met Gala 2019 फॅशन जगातला सर्वात महत्वाचा कार्यक्रम मानला जातो.

Updated: May 8, 2019, 07:34 PM IST
मेट गालासाठी रणवीर परफेक्ट - दीपिका पादुकोन title=

मुंबई  : Met Gala 2019 फॅशन जगातला सर्वात महत्वाचा कार्यक्रम मानला जातो. प्रत्येक वर्षीप्रमाणे यांदाच्या वर्षीही मेट गालाची धूम सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. Camp: Notes on Fashion या थीमअंतर्गत सेलिब्रिटींनी कपडे घातले होते. या कार्यक्रमात दीपिका गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर आली होती. तेव्हा तिने मेट गाला कार्यक्रम रणवीरसाठी परफेक्ट असल्याचे वक्तव्य केले होते.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

CAMP:NOTES ON FASHION MET GALA 2019 @zacposen @lorraineschwartz @sandhyashekar @georgiougabriel @shaleenanathani @nehachandrakant

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

रणवीर नेहमीच त्याच्या अनोख्या कपड्याच्या स्टाईलवरून चर्चेत असतो. या कार्यक्रमाच्या थीमला रणवीरने १०० टक्के न्याय दिले असते.  असे मत दीपिकाने व्यक्त केले. या कार्यक्रमात कलाकारांची अशी काही रुपं पाहायला मिळाली जी पाहता अनेकजण थक्कच झाले.

सध्या दीपिका तिच्या 'छपाक' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ऑसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या काही कठीण प्रसंगावर बेतलेला हा चित्रपट आहे. ऑसिड हल्ला होवूनही आयुष्य स्वछंदीपणे जगणाऱ्या कर्तुत्ववान स्त्रीच्या आयुष्यावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.‘छपाक’मध्ये दीपिका साकारत असणाऱ्या पात्राचे नाव ‘मालती’ आहे.