श्रीदेवी यांच्या 'या' घरात राहू शकता अगदी मोफत! त्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या

Sridevi's House :  श्रीदेवी यांच्या या घरात आता तुम्हाला ही राहता येणार... तेही मोफत... कसं जाणून घ्या...

दिक्षा पाटील | Updated: May 4, 2024, 11:28 AM IST
श्रीदेवी यांच्या 'या' घरात राहू शकता अगदी मोफत! त्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या title=
(Photo Credit : Social Media)

Sridevi's House : बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर हे अधून-मधून त्यांच्या चैन्नईच्या घरात जायचे. कारण तिथे श्रीदेवी यांच्या अनेक आठवणी आहेत. त्याचं कारण म्हणजे श्रीदेवी यांनीच चेन्नईचं घर बनवलं. सी-फेसिंग असलेल्या या घराचं रुपांतर त्यांना हॉटेलमध्ये करायचं होतं. पण त्या होत्या तोपर्यंत हे शक्य झालं नाही. आता श्रीदेवी यांचं स्वप्न जान्हवी आणि बोनी कपूर यांनी मिळून पूर्ण केलं आहे. 

जान्हवी आणि बोनी यांनी श्रीदेवी यांच्या या घराला पुन्हा एकदा रेनोव्हेट करुन त्याला हॉटेलचं रुप दिलं आहे. इथे आता लोक येऊन राहू शकतील आणि इथल्या आवाराचा आनंद घेतील. जान्हवीनं हे घर एका रेंटल कंपनीला दिलं आहे, त्याला त्यांनी हे 'आइकॉन' या कॅटेगरीत टाकलं आहे. श्रीदेवी यांनी हे खर बोनी कपूर यांच्याशी लग्न करुन झाल्यानंतर खरेदी केलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवीनं रेंटल कंपनीसोबत या प्रॉपर्टीचं टायअप केलं आहे. त्याविषयी बोलताना जान्हवी म्हणाली, मला आठवण आहे की आम्ही आईचे वाढदिवस तिथे साजरे केले आहेत. माझा आणि वडिलांचा वाढदिवसही तिथेच साजरा केला आहे. आई गेल्यानंतर आम्ही या घरात जास्त वेळ व्यथित केला नाही. कारण रेनोवेशन देखील झालं नव्हतं. आईची इच्छा होती की घराला थोडं ठीक करुन त्याला हॉटेलचं रुपांतर द्यायचं. आई गेल्यानंतर बाबांनी त्याला रेनोव्हेट केलं. मला आठवण आहे की ते म्हणायचे की मला श्रीसाठी हे करावंच लागेल. त्यांनी केलं आणि आम्ही बाबांचा वाढदिवस तिथे साजरा केला. आई गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. 2-3 वर्षांनंतर मी बाबांना इतकी आनंदी असल्याचं पाहिलं होतं. 

हेही वाचा : 'मी ब्रेकअप केलं'; सुहानाच्या व्हिडीओवर अगस्त्य नंदांच्या आईच्या 'त्या' कमेंटनं वेधलं लक्ष

फ्रीमध्ये राहू शकता!

जर तुम्हाला या हॉटेलमध्ये मोफत राहायचं असेल तर त्यासाठी त्यांना तिथे अप्लाय करावं लागणार. जर त्यांना याच गोल्डन तिकिट मिळालं तर त्यांना काही क्रायटेरियामध्ये त्यांना तिथे मोफत राहण्याची संधी मिळेल. यावर्षी त्याची 4000 तिकिट उपलब्ध आहेत. जे लोक ही तिकिटं जिंकतील त्यांना खूप कमी रक्कम देत याठिकाणी स्टे करु शकतात.