तीन वर्षांपासून एकाच तरुणीचे ऑडिशन्स का घेतायत तारक मेहता..' चे प्रोड्युसर? अभिनेत्रीने केला खुलासा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेतील दयाबेन या प्रमुख कॅरेक्टरसाठी 3 वर्षापासून अभिनेत्रीचे ऑडिशन सुरु होते. 

Pravin Dabholkar | Updated: May 14, 2024, 04:00 PM IST
तीन वर्षांपासून एकाच तरुणीचे ऑडिशन्स का घेतायत तारक मेहता..' चे प्रोड्युसर? अभिनेत्रीने केला खुलासा title=
New Dayaben In TMKOC

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणापासून चर्चेत आहे. ही मालिका घराघरात पाहिली जाते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मालिका सर्वांचे मनोरंजन करत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. त्या कलाकारांच्या जागेवर मेकर्सने नवे कलाकार घेतले. असे असले तरी मालिकेतील दयाबेन या प्रमुख कॅरेक्टरसाठी त्यांना कलाकार सापडत नाहीय.

तारक मेहता मालिकेत दयाबेनचे कॅरेक्टर अभिनेत्री दिशा वकानी करत असे. तिने साधारण 7 वर्षांपूर्वी ही मालिका सोडली. यानंतर ती पुनरागमन करेल अशा चर्चा होत्या पण तसे काही झाले नाही. दरम्यानच्या काळात निर्मात्यांनी या भूमिकेसाठी अनेक टीव्ही कलाकारांच्या ऑडिशन घेतल्या.  पण दिशा वकानीप्रमाणे कोणी दयाबेन त्यांना आढळत नाही. आता निर्मात्यांना नवी दयाबेन सापडली आहे. खुद्द निर्मात्यांनीच याबद्दलचा खुलासा केला आहे. दिशा वकानीला शोमध्ये आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु असे काही दिवसांपुर्वी निर्मात्यांनी सांगितले होते. पण दिशा अभिनयापासून दूर आपल्या कुटुंबात व्यस्त आहे. तिने वारंवार याबद्दल माहिती दिली आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रीत करायचे असल्याचे ती अनेक मुलाखतींमध्ये सांगत असते. 

नवी दयाबेन कोण आहे? 

त्यामुळे निर्मात्यांनी नवीन दयाबेनचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि यात त्यांना यशदेखील आले आहे. मालिकेत मिसेस सोधीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने याचा खुलासा केला आहे. जेनिफर मिस्त्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ती नवीन दयाबेनबद्दल बोलत आहे. यामुळे नवी दयाबेन कोण आहे? तिला स्क्रिनवर यायला इतका उशीर का लागतोय? अशी खूप माहिती चाहत्यांना मिळाली आहे.  

3 वर्षांपासून एका मुलीचे ऑडिशन 

निर्माते दयाबेनच्या भूमिकेसाठी खूप गांभीर्याने विचार करत आहेत. पण दिशासारखाच अभिनय करणारी अभिनेत्री सापडणे त्यांना कठीण जात आहे. नवा बदल प्रेक्षकांनी स्वीकारायला हवा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून गेल्या 3 वर्षांपासून एका मुलीचे ऑडिशन घेत आहेत. ती अभिनेत्री  दयाबेनसारखी दिसते. त्यामुळे तिला थेट दिल्लीहून बोलावले आहे. ही मुलगी अवघी 28-29 वर्षांची असल्याचे जेनिफरने म्हटलंय. असं सर्व असलं तरी दिशा वकानी आणि त्या मुलीच्या वयात खूप फरक आहे आणि म्हणूनच तिच्या आणि निर्मात्यांमध्ये ताळमेळ बसत नाहीय, असं सांगितलं जातंय.

मॉक टेस्टचा व्हिडिओ शूट

मालिकेतील कलाकारांनी सेटवर त्या मुलीसोबत मॉक टेस्टचा व्हिडिओही शूट केला. त्यादरम्यान सर्वात आधी तिचे दिलीपजींसोबत मॉक शूट करण्यात आले. त्यानंतर तिचे संपूर्ण टप्पू सेनेसोबत मॉक शूट व्हिडिओ बनवण्यात आल्याचे जेनिफर सांगते.

चेहरा दयाबेनसारखा नाही

त्या मुलीचा चेहरा दयाबेनसारखा नाही. असे असले तरी ती मुलगी डोळे मिटून बोलली तर दोघांमध्ये काय फरक आहे? हे कोणीच ओळखू शकत नाही, असे जेनिफरने आपल्या व्हिडीओतून सांगितले आहे.