शाब्बास सुनबाई! शिवानीला पुरस्कार मिळताच मृणाल कुलकर्णींच्या 'त्या' कृतीचं कौतुक

Shivani Rangole Mrunal Kulkarni: पुरस्कार मिळणं ही आपल्या आयुष्यातील फारच महत्त्वाची गोष्ट असते. त्यातून आपल्याला योग्य त्या व्यक्तीकडून त्याचे कौतुक मिळणे हे फारच महत्त्वाचे असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची जोरात चर्चा आहे. पुरस्कार मिळताच सासूबाईंनी तिचं इतकं कौतुक केले की काही विचारू नका. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 5, 2023, 05:12 PM IST
शाब्बास सुनबाई! शिवानीला पुरस्कार मिळताच मृणाल कुलकर्णींच्या 'त्या' कृतीचं कौतुक  title=
mrinal kulkarni praises her daughter in law shivani rangole after getting zee marathi award

Shivani Rangole Mrunal Kulkarni: नुकतेच झी मराठी अवोर्ड पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे तिची जोरात चर्चा आहे. काल झी मराठीवर या पुरस्कार सोहळ्यांचे प्रक्षेपण दाखवण्यात आले आहे. यावेळी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेला सर्वाेत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार मिळाला आहे. ही मालिका यावर्षी 13 मार्चपासून सुरू झाली असून या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. अधिपती आणि अक्षराची जोडीही प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हापासून त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. मागील महिन्यात त्या दोघांच्या लग्नाचे स्पेशल एपिसोडही तूफान चर्चेत होते. शिवानी रंगोळे, कविता मेढेकर आणि हृषिकेश शेलार यांच्या या मालिकेत प्रमुख भुमिका आहेत. यावेळी झी मराठी अवोर्डमध्ये अक्षराला सर्वोत्कृष्ट नायिका, अधिपती आणि अक्षराला सर्वाेत्कृष्ट जोडीचाही मान मिळाला आहे. 

शिवानी रंगोळेला यावेळी विशेष लक्षवेधी चेहरा हा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्यामुळे यावेळी तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. शिवानी रंगोळे हिनं अनेक मराठी नाटक, मालिका तसेच चित्रपटांतून कामं केली आहे. शिवानीनं लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. मध्यंतरी तिनं आपला एक जुना व्हिडीओही पोस्ट केला होता. त्यात तिनं आपल्या अगदी लहानवयातील एका भुमिकेचा व्हिडीओ शेअर केला होता. ही मालिका होती 'उपनिषद गंगा'.

या मालिकेची छोटीशी क्लिप तिनं इन्स्टाग्रामवरून शेअर केली होती. ''माझं लहानपणीचं काम अचानक insta ला दिसू लागलं आणि मला खूप लोकांनी विचारलं की ' ही तूच आहेस का?'!! गंमत वाटली की इतक्या वर्षांनी ही मी बहुतेक तशीच दिसत असेन म्हणून लोकांनी लगेच ओळखलं! इयत्ता पाचवीत असताना डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी ह्यांच्या 'उपनिषद गंगा' नावाच्या मालिकेतली ही छोटीशी क्लिप!'', असं कॅप्शनही तिनं लिहिलं होतं. 

यावेळी तिची झी मराठीवरील ही मालिका प्रचंड लोकप्रिय असून ती या मालिकेसाठी अपार मेहनत घेत आहे. शिवानीच्या वाढदिवशी मृणाल कुलकर्णी यांनी एक गोड व्हिडीओही शेअर केला होता ज्यात त्यांनी हे नमूद केले होते की कशाप्रकारे ती आपल्या या मालिकेसाठी प्रचंड मेहनत घेते आहे. यावरून त्या दोघींमधील बॉन्डिंग हे चांगलेच लक्षात येते आहे. त्या अनेकदा एकमेकांसोबतच्या पोस्ट या सोशल मीडियावर शेअर करतात त्यावरून त्यांची सासू सुनेचे नाते हे अधिकच अधोरेखित होते. 

शिवानी रंगोळेला यंदाचा झी मराठी अवोर्ड विशेष लक्षवेधी चेहरा या पुरस्करानं सन्मानित करण्यात आले होते. तेव्हा तो क्षण टिपण्यासाठी मृणाल कुलकर्णी लगेचच तिचा फोटो काढतात. तेवढ्यात अधिपतीने सर्वांसमोर सांगितलं की, ''तिच्या खऱ्या सासूबाईंना पाहा किती आनंद झालाय''.