'आयुष्यात चांगले दिवस मिळवण्यासाठी...', अपूर्वा नेमळेकर दिला मोलाचा सल्ला

सध्या अपूर्वा ही 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत झळकत आहे. आता मात्र तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Updated: Feb 16, 2024, 06:10 PM IST
'आयुष्यात चांगले दिवस मिळवण्यासाठी...', अपूर्वा नेमळेकर दिला मोलाचा सल्ला title=

Apurva Nemlekar Cryptic Post : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणून अपूर्वा नेमळेकरला ओळखले जाते. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारले होते. यानंतर अपूर्वा नेमळेकर 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात झळकली. विशेष म्हणजे ती या पर्वाची रनरअप ठरली होती. सध्या अपूर्वा ही 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत तिने खलनायिकेचे पात्र साकारले आहे. आता मात्र तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. ती इन्स्टाग्रामवर सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता नुकतंच अपूर्वाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक खुलासा केला आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 

अपूर्वा नेमळेकरची पोस्ट चर्चेत

"तुमच्या आयुष्यातील चांगले दिवस मिळवण्यासाठी तुम्हाला काही वाईट दिवसांशी संघर्ष करावा लागतो", असे अपूर्वा नेमळेकरने म्हटले आहे. त्यासोबतच तिने "संयम हीच गुरुकिल्ली आहे" असा हॅशटॅगही यात वापरला आहे. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे. 

Apurva Nemlekar post

दरम्यान ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंताची लव्हस्टोरी प्रचंड चर्चेत होती. या मालिकेत शेवंता ही भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साकारली होती. तिच्या या भूमिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. या मालिकेमुळे तिचा चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन

सध्या अपूर्वा ही ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेद्वारे अपूर्वाने दीर्घ काळाने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेत अपूर्वा नेमळेकर ही सईच्या आईची भूमिका साकारत आहे. सावनी असे तिच्या पात्राचे नाव आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडताना दिसत आहे. तिने यात खलनायिकेचे पात्र साकारले आहे. यात तिच्यासोबतच अभिनेता राज हंसनाळे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान हे कलाकारही प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. त्यासोबत यात बालकलाकार इरा परवडे मुख्य भूमिकेत दिसत आहे. सध्या ही मालिकादेखील टीआरपीच्या यादीत टॉप 5 स्थानांवर आहे.