बास्केटबॉल खेळाडूच्या अपघाती निधनाने हळहळलं बॉलिवूड

अनेकांनीच या  NBA स्टार खेळाडूच्या.... 

Updated: Jan 27, 2020, 11:10 AM IST
बास्केटबॉल खेळाडूच्या अपघाती निधनाने हळहळलं बॉलिवूड  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : या आठवड्याची सुरुवात अनेकांसाठी चांगली झालेली नाही. जागतिक ख्यातीप्राप्त, बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याच्या अपघाती निधनाने अनेकांनाच धक्का दिला. सोशल मीडिया, कलाविश्व आणि क्रीडा वर्तुळातून ही धक्कादायक बातमी कळताच ब्रायंटच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं. 

अनेकांनीच या  NBA स्टार खेळाडूच्या आठवणींना उजाळा दिला. रणवीर सिंग, अर्जुन कपूर, अभिषेक बच्चन, प्रियांका चोप्रा या साऱ्यांनी ब्रायंटच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं. अभिनेता अक्षय कुमार याने ब्रायंटचा त्याच्या मुलीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने ब्रायंट आणि त्याच्या मुलीला श्रद्धांजली वाहिली. 

अमेरिकेचा सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा रविवारी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. कोबी ब्रायंट याच्यासह ९ जणांना या अपघातात त्यांचा प्राण गमावावा लागला. मृतांमध्ये ब्रायंटच्या १३ वर्षीय मुलीचाही समावेश असल्याची माहिती अमेरिकी मीडियाने दिली आहे. 

 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

कॅलिफोर्नियाच्या कॅलबसासजवळ हा अपघात झाला. सकाळी साधारण दहा वाजण्याच्या सुमारास कोबी ब्रायंट याला घेऊन जात असलेलं एक हेलिकॉप्टर येथील दुर्गम भागात कोसळलं. हॅलिकॉप्टरने हवेतच पेट घेतल्याचीही प्राथमिक माहिती देण्यात येत आहे.