ही आहेत दीपिकाच्या सासरची मंडळी

सासरची मंडळी पाहून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य 

ही आहेत दीपिकाच्या सासरची मंडळी  title=

मुंबई : सहा वर्षे रोमँटिक रिलेशनशिपमध्ये असलेले दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. इटलीतील लेक कोमोमध्ये हा विवाह सोहळा 2 दिवस चालणार आहे. 14 नोव्हेंबरला कोकणी पद्धतीने तर आता 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे. दीपिका आणि रणवीरची प्रेमकहाणी तर आपल्याला माहितच आहे. पण दीपिकाच्या सासरच्या मंडळींबद्दल तुम्हाला फार कमी माहित असेल. तर जाणून घेऊया... 

रणवीर सिंह सिंधी असून त्याचं आडनाव हे भवनानी आहे. रणवीरचे वडिल जगजीत सिंह भवनानी हे रिअल इस्टेटमधील मोठं नाव आहे. तर रणवीरची आई अंजू भवनानी होममेकर असून त्या सामाजिक सोहळ्यात फार कमी दिसतात. 

दीपिका पदुकोणची नणंद म्हणजे रणवीर सिंहची सख्खी बहिण रितिका भवनानी. रणवीर आपल्या बहिणीच्या अगदी जवळ असून तो प्रत्येक गोष्टी शेअर करत असतो. 

आपल्याला माहित नसेल पण रणवीर सिंह हा अनिल कपूरच्या परिवाराशी निगडीत आहे. रणवीर सिंह अभिनेता अनिल कपूरच्या पत्नीचा सुनीता कपूर भवनानीचा भाचा आहे. त्यावरूनच तो सोनम कपूर आणि रिया कपूरचा चुलत भाऊ देखील आहे. म्हणजे सोनम कपूर आता दीपिका पदुकोणची नणंद आहे. 

तसेच सोनम कपूरचे काका बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर हा रणवीर सिंहचा चांगला मित्र आहे. या नात्याने आता तो दीपिकाचा दीर आहे.