Jug Jug Jeeyo मधील नव्या गाण्याची 'या' कारणामुळे उडवली जातेय खिल्ली

वरुण धवन आणि कियारा अडवाणी स्टारर जुग-जुग जिओ लवकरच रिलीज होणार आहे.

Updated: Jun 12, 2022, 11:42 PM IST
Jug Jug Jeeyo मधील नव्या गाण्याची 'या' कारणामुळे उडवली जातेय खिल्ली title=

मुंबई : वरुण धवन आणि कियारा अडवाणी स्टारर जुग-जुग जिओ लवकरच रिलीज होणार आहे. त्यामुळे त्याची स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील दोन गाण्यांनी धमाल उडवली असून, आता या चित्रपटातील तिसरं गाणंही रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याचं टायटल 'दुपट्टा' असून या गाण्याची खिल्ली उडवली जात आहे.

जग जुग जिओचं नवीन गाणं
कियारा आणि वरुण यांच्या जुग जुग जिओ या चित्रपटातील 'दुपट्टा' हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. हे एक पार्टी साँन्ग आहे. जे खूप पसंत केलं जात आहे. मात्र एका खास कारणामुळे सोशल मीडियावर या गाण्याची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. खरं तर, गाण्यात दुपट्ट्याची चर्चा आहे. पण कियाराने या गाण्यात कुठेही दुपट्टा घेतला नाही. ती वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसत आहे. जसं हे गाणं आलं आणि लोकांनी ते पाहिलं, त्यानंतर त्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडिया युजर्सनी प्रश्न केले उपस्थित 
हे गाणं पाहून लोक प्रश्न विचारू लागले की, तिचा दुपट्टा कुठे आहे? त्याचबरोबर, अजून एक युजर्स म्हणाला, गाणं दुपट्ट्यावर आहे पण दुपट्टा कुठे आहे? तर अजून एकाने लिहिलं, आता या गाण्यात  दुपट्टा शोधा.