संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'मध्ये काम करण्यासाठी कोणी घेतलं सगळ्यात जास्त मानधन?

Heeramandi Cast Fees : 'हीरामंडी' या सीरिजमध्ये काम केलेल्या कलाकारांनी किती मानधन घेतलं माहितीये? 

दिक्षा पाटील | Updated: May 4, 2024, 05:18 PM IST
संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'मध्ये काम करण्यासाठी कोणी घेतलं सगळ्यात जास्त मानधन?  title=
(Photo Credit : Social Media)

Heeramandi Cast Fees : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला यांची पीरियेड ड्रामा सीरिज हीरामंडी: द डायमंड बाजार प्रदर्शित झाली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा आतापर्यंतचा सगळ्यात ग्रॅंड प्रोजेक्ट आहे. हीरामंडीची पटकथा ही 1940 च्या दशकात असलेल्या ब्रिटीश राजवटीतीली भारतावर आधारीत आहे. हीरामंडीत राहणाऱ्या वेश्यांवर आधारीत आहे. या सीरिजमध्ये सगळंच खूप महाग आणि लग्झरीयस होतं. दरम्यान, या सीरिजमध्ये दिसलेल्या अभिनेत्रींनी किती मानधन घेतलं याविषयी आज आपण जाणून घेऊया.
 
TOI आणि News18 च्या रिपोर्ट्सनुसार, संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटासाठी जवळपास 200 कोटी खर्च केले आहेत. या सीरिजमध्ये मनीषा कोयराला, सोनाक्षी सिन्हा, अदिति राव हैदरी, शर्मिन सहगल, रिचा चड्ढा आणि संजीदा शेख महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या. तर अभिनेता फरदीन खान, अध्ययन सुमन आणि ताहा शाह बादुशासारखे कलाकार देखील दिसले. चला तर जाणून घेऊया या कलाकारांना किती मानधन मिळालं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

1. हृतिक रोशनच्या फायटर चित्रपटात भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या संजीदा शेखनं हीरामंडीमध्ये वहीदाची भूमिका साकारण्यासाठी 40 लाख रुपये मानधन म्हणून घेतले. 

2. संजय लीला भन्साळी यांची भाची शरमीन सेगलनं आलमजेबच्या भूमिकेसाठी 35 लाख मानधन म्हणून घेतले. 

3. DNA रिपोर्टनुसार, रिचा चड्ढानं लज्जो ही भूमिका साकारली आहे. तर त्यासाठी 1 कोटी रुपये मानधन घेतले. 

4. मनीषा कोयराला ही तब्बल 3 दशकांनंतर संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करताना दिसत आहेत. या सीरिजमधील मनीषा कोयरालाच्या भूमिकेची आणि अभिनयाची सगळीकडेच स्तुती सुरु आहे. या आधी मनीषा कोयरालानं संजय लीला भन्साळी यांच्यासोबत 1996 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खामोशी: द म्यूजिकल’ मध्ये हजेरी लावली होती. तर मल्लिकाजानची भूमिका साकारण्यासाठी मनीषा कोयरालानं 1 कोटी मानधन घेतलं. 

5. रिपोर्ट्सनुसार, हीरामंडीमध्ये बिब्बोजान ही भूमिका साकारण्यासाठी अदिती राव हैदरीनं 1.5 कोटी मानधन घेतलं. 

6. सोनाक्षी सिन्हानं या सीरिजसाठी सगळ्यात जास्त मानधन घेतलं आहे. सोनाक्षीनं या सीरिजसाठी 2 कोटी मानधन घेतलं. 

हेही वाचा : 'कृपया, आमच्या घरातून काही चोरु नका'; जान्हवी कपूरने पाहुण्यांना का केली ही अजब विनंती? 

7. फरदीन खान हा जवळपास 14 वर्षांनंतर पडद्यावर पदार्पण करत आहे. त्यानं या सीरिजमध्ये मोहम्मदच्या भूमिकेसाठी त्याला 75 लाख मानधन घेतले.