'वडिलांच्या त्रासाला कंटाळुन 13 व्या वर्षी...' जॉनी लिवर यांचा धक्कादायक खुलासा

Johnny Lever Life : बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिवर यांनी एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. जॉनी लिवर यांना लहानपणापासून संघर्ष करावा लागला. यातूनच वडिलांच्या त्रासामुळे धक्कादाय पाऊल उचलणार होतो असं जॉनी लिवर यांनी या मुलाखतीत सांगितलं.

राजीव कासले | Updated: Feb 15, 2024, 08:09 PM IST
'वडिलांच्या त्रासाला कंटाळुन 13 व्या वर्षी...' जॉनी लिवर यांचा धक्कादायक खुलासा title=

Johnny Lever Life : जॉनी लिवर यांचं नाव ऐकताच आपल्या प्रत्येकाच्या नावावर हसु उमटतं. जॉनी लिवर (Johny Lever) यांच्या विनोदांनी प्रत्येकाच्या आयुष्यात दु:ख काही क्षण का होईना दूर होतं. आपल्या विनोदी अभिनयाने (Comedy Acting) जॉनी लिवर यांनी बॉलिवूडवर आपली वेगळी छाप उमटवली. पण प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमलवणाऱ्या जॉनी लिवर यांचं आयुष्य मात्र प्रचंड खडतर होतं. त्यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकॉस्ट मुलाखतीत जॉनी लिवर यांनी आपल्या आयुष्याचा उलगडा केला आहे. बॉलिवूडमध्ये (Bollywood) प्रवेश करण्यााआधी जॉनी लिवर यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. 

लहानपणात संघर्ष
पॉडकास्ट मुलाखतीत जॉनी लीवर यांनी आपल्या संघर्षमय आयुष्याची माहिती दिली. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे जॉनी लिवर यांना अनेक समस्यांना सामोर जावं लागलं. दोन वेळच्या जेवणाचीसाठीही त्यांना संघर्ष करावा लागत होता. जॉनी लिवर काम करायचे तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना जेवायला मिळायचं. वडिलांना दारुचं व्यसन होतं, त्यामुळे ते कामावरही जात नव्हते असं जॉनी लिवर यांनी सांगितलं.

जॉनी लिवर उचलणार होते टोकाचं पाऊल
छोटी-मोठी कामं करुन जॉनी लिवर आपल्या कुटुंबाला सांभाळत होते. पण या सर्व परिस्थितीला ते कंटाळले होते. आयुष्यात आपलं काय होणार, असंच गरिबीत जगावं लागणार का? या विचाराने ते त्रासले होते. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा विचार केला होता. जीव देण्यासाठी ते रेल्वे पटरीवर गेले, समोर वेगाने ट्रेन येत होती. पण त्याचवेळी त्यांच्या समोर बहिणींचा चेहरा आला आणि त्यांनी जीव देण्याचा आपला निर्णय बदलला. असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं. 

गाण्याने बदललं आयुष्य
एका गाण्याने आपलं आयुष्य बदलल्याचं  ते सांगतात. एका दुकानात गेले असता तिथे एक गाणं वाजत होतं. ते गाणं होतं, 'मै तो तूम संग नैन मिलाके'. हे गाणं ऐकून आपल्या मनावरचा तणाव काहीसा कमी झाला. त्याचवेळी गाण्यात ताकद आहे हे कळलं आणि संगीताने मला जगायला शिकवलं असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री
जॉनी लिवर हे स्टेज करायचे. बॉलवुडमधल्या कलाकारांचे आवाज काढून ते लोकांना हसवायते. एका कार्यक्रमात अभिनेते सुनील दत्त यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी जॉनी लिवर यांना 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात पहिला ब्रेक दिला. यानंतर जॉनी लिवर यांनी मागे वळून पाहिलं नाही. आजपर्यंत जॉनी लिवर यांनी जवळपास 350 चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.