गरोदरपणाच्या अफवांवर भडकली दीपिका

दीपिका गरोदर असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

Updated: Apr 14, 2019, 12:01 PM IST
गरोदरपणाच्या अफवांवर भडकली दीपिका title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अव्वल स्थानी असलेल्या अभिनेत्रींपैकी दीपिका पादुकोनही एक आहे. ती सध्या तिच्या 'छपाक' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर दुसरीकडे ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधान येत आहे. गतवर्षी ती आणि अभिनेता रणवीर सिंग विवाह बंधणात अडकले. तेव्हापासून दीपिका गरोदर असल्याच्या चर्चा रंगत आहेत. पण खुद्द दीपिकाने या सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व अफवांना पूर्णविराम लावले आहे. 

नेहमी हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर दीपिका हसून प्रश्न टाळायची, पण आता तिचा पारा चांगलाच चढल्याचे दिसून आले. ती म्हणाली, 'जेव्हा केव्हा व्हायचं असेल तेव्हा होईल, आपल्या समाजात लग्नानंतर महिलांवर नेहमीच मुलांवरून दबाव आणले जातात. महिलांना अशी वागणूक देणे हे फार खालच्या पातळीचे विचार आहेत. त्यांना स्वत:च्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क आहे.'

ऱणवीर आणि दीपिका फार काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. अखेर २०१८ साली हे जोडपे लग्न बंधणात अडकले. दीपिका सध्या 'छपाक' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मेघना गुलजार करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी १० जानेवारीला रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.