दीपिका पदुकोणने शेअर केली 'ही' बालपणीची महत्वाची गोष्ट

चाहत्यांना आवडेल रणवीर सिंहची कमेंट 

Updated: Oct 1, 2019, 10:41 AM IST
दीपिका पदुकोणने शेअर केली 'ही' बालपणीची महत्वाची गोष्ट  title=

मुंबई : दीपिका पदुकोण आपल्या सिनेमाप्रमाणेच सोशल पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असते. मग ती पोस्ट तिच्या कपड्यांची असो वा सिनेमांची. आज पुन्हा एकदा दीपिकाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दीपिकाने आपल्या लहानपणीची अत्यंत महत्वाची गोष्ट शेअर केली आहे. 

दीपिका पदुकोणने आपल्या तीन रिपोर्ट कार्डचे म्हणजे रिझल्टचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिच्या शिक्षकांनी तिला रिमार्क दिला आहे. हा रिमार्क तिच्या चाहत्यांसाठीच नाही तर अभिनेता आणि तिचा पती रणवीर सिंहसाठी देखील अत्यंत महत्वाचा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Oh!

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

तिच्या या रिमार्कवरून आपण अंदाज लावू शकतो की, ती शाळेत किती मस्तीखोर होती. रिमार्कमध्ये असं लिहीलं आहे की, दीपिका खूप बोलते. दिलेल्या सूचनांच पालन तिने करायला हवं. एवढंच नव्हे तर ती दिवसा स्वप्न बघते असं देखील यामध्ये म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hmmmmm...

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाच्या याच रिमार्कवर रणवीर सिंहने कमेंट केली आहे. दीपिकाने या सर्व सुचनांचे पालन करायला हवे. तर ती स्वप्न बघते त्यावर रणवीर म्हणतो की, मन ढगात आहे.... चाहते देखील या कमेंटला बघून अतिशय खूष झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Really!?!?

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका आणि रणवीर सिंह नुकतेच IIFA Award 2019 मध्ये आपल्याला दिसले. 'पद्मावत' करता सर्वोत्कृष्ठ अभिनेता म्हणून रणवीर सिंहला पुरस्कार मिळाला आहे. तर दीपिकाने 'चेन्नई एक्सप्रेस'करता सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे.