'हॉलिवूडपटाची नक्कल करणाऱ्या चित्रपटाला कोण ऑस्कर देणार?'

कंगनाच्या बहिणीचा 'गली बॉय'वर निशाणा

Updated: Dec 18, 2019, 08:15 PM IST
'हॉलिवूडपटाची नक्कल करणाऱ्या चित्रपटाला कोण ऑस्कर देणार?' title=

मुंबई : झोया अख्तरच्या दिग्दर्शनात साकारलेल्या gully boy 'गली बॉय' या बॉलिवूड चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळवलं होतं. पण, यंदाही भारताच्या वाट्याला मानाचा ऑस्कर पुरस्कार येण्याचं स्वप्न काही पूर्ण होणार नसल्याचं स्पष्ट झालं. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'गली बॉय' या चित्रपटाची ऑस्करवारी अर्ध्यावरच थांबली आहे. 

हिंदी कलाविश्वात यामुळे काही प्रमाणात निराशा असली तरीही अनेकांनी या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या वाटचालीला दाद दिली आहे. या सर्व वातावरणात अभिनेत्री कंगना रानौतच्या बहिणीचं मात्र वेगळंच मत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम कलाविश्वातील घडामोडींवर वक्तव्य करणाऱ्या रंगोलीने यावेळी रणवीर आणि आलियाच्या 'गली बॉय' या चित्रपटावर निशाणा साधला आहे. 

वाचा : ही आहे एखाद्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळण्याची प्रक्रिया.....

हा चित्रपट 8 Mile या हॉलिवूडपटावर आधारित असल्याचं सांगत, गली बॉय म्हणजे एका हॉलिवूडपचटाची नक्कलच आहे असं म्हणत तिने या चित्रपटावर निशाणा साधला. शिवाय उरी आणि मणिकर्णिका या चित्रपटांशी तुलना करत हा चित्रपट मुळ कथेवर आधारलेला नसल्याचीच बाब तिने उचलून धरली. 

रंगोलीच्या या ट्विटशी काहीजण सहमत असल्याचं पाहायला मिळालं. तर काहींनी तिच्या या ट्विटवर चर्चाही केली. आता तिच्या या ट्विचवर गली बॉयशी संलग्न कुणी व्यक्ती काही प्रतिक्रिया देते का हे पाहावं लागेल. एखाद्या कलाकारावर किंवा चित्रपटावर टीका करण्याची रंगोलीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा अनेकदा बॉलिवूड कलाकारांवर तिने तोफ डागली आहे.