'मी रिलेशनमध्ये...', निशांत पिट्टीसोबतच्या 'त्या' फोटोवर कंगना रणौतचा खुलासा

कंगनाने तिच्या आणि प्रसिद्ध व्यावसायिक निशांत पिट्टी यांच्या  व्हायरल फोटोबद्दलही खुलासा केला आहे. 

Updated: Jan 24, 2024, 05:18 PM IST
'मी रिलेशनमध्ये...', निशांत पिट्टीसोबतच्या 'त्या' फोटोवर कंगना रणौतचा खुलासा title=

Kangana Ranaut on Dating Rumours : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. बॉलिवूडची क्वीन म्हणून तिला ओळखले जाते. कंगना रणौतने नुकतंच अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी कंगना रणौत आणि प्रसिद्ध व्यावसायिक निशांत पिट्टी यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले. यानंतर ते दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता खुद्द कंगना रणौतने यावर स्पष्टीकरण दिले आहे. 

कंगना रणौत ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. काही तासांपूर्वीच कंगनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने तिच्या रिलेशनशिपबद्दल गौप्यस्फोट केला आहे. तसेच तिने तिच्या आणि प्रसिद्ध व्यावसायिक निशांत पिट्टी यांच्या  व्हायरल फोटोबद्दलही खुलासा केला आहे. 

कंगना रणौत काय म्हणाली?

कंगनाने एका बातमीचा स्क्रीनशॉर्ट पोस्ट केला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, "माझी मीडियाला नम्र विनंती आहे, कृपया चुकीची माहिती पसरवू नका. निशांत पिट्टी यांचे लग्न झाले आहे आणि मी दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे. मी योग्यवेळ आल्यावर याबद्दल नक्कीच सांगेन. त्यामुळे उगाचच अडचणीत टाकू नका. एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषासोबत फोटो काढल्याने तिचे नाव त्या पुरुषाशी जोडणं योग्य नाही", असे कंगनाने यावेळी म्हटले आहे. 

कंगनाची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल झाली आहे. तिच्या या पोस्टमध्ये तिने मी दुसऱ्या व्यक्तीला डेट करत असल्याचा खुलासा केला आहे. आता कंगना नक्की कोणाला डेट करत आहे, तिचे कोणासोबत रिलेशनशिप सुरु आहे, या चर्चांना उधाण आले आहे.  

Kangana Ranaut Post

कंगना साकारणार इंदिरा गांधींची भूमिका

दरम्यान कंगना ही सध्या तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे ती सिनेसृष्टीत दमदार पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. इमर्जन्सी हा चित्रपट येत्या 14 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगनाने अभिनयासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटात कंगनसोबतच अनुपम खेर, महिमा चौधरी, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक आणि श्रेयस तळपदे हे कलाकारही दमदार भूमिकेत झळकणार आहेत. तर दुसरीकडे निशांत पिट्टी हे ‘इझी माय ट्रिप’ या ऑनलाईन ट्रव्हल कंपनीचा सह-संस्थापक आहे. विशेष म्हणजे तो ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाचा सह-निर्माता होता.