दीपिकाचं अजब- गजब फिटनेस ट्रेनिंग पाहून तुम्हीही व्हाल थक्क

व्हिडिओ पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा... 

Updated: Mar 2, 2020, 01:11 PM IST
दीपिकाचं अजब- गजब फिटनेस ट्रेनिंग पाहून तुम्हीही व्हाल थक्क  title=
दीपिका पदुकोण

मुंबई : हल्लीच्या दिवसांमध्ये अभिनेत्री कमनीय बांध्यापेक्षा जास्त महत्त्व हे सुदृढ शरीरयष्टीला देतात. यामध्ये खाण्यापिण्यच्या सवयींमध्ये बदल करण्यापासून ते अगदी जीममध्ये जाऊन विविध पद्धतींनी व्यायाम करण्याचा समावेश असतो. व्यायाम, संतुलित आहार या बळावर दैनंदिन जीवनात योग्य तो समतोल राखण्यामध्ये अग्रेसर असणारी अभिनेत्री म्हणजे, दीपिका पदुकोण  Deepika Padukone. 

दीपिका कायमच तिच्या कामाला जितकं महत्त्वं देते तितकंच किंबहूना त्यातून जास्त महत्त्व ती व्यायामाला देते.  व्यायाम आणि जीमचं नाव घेतल्यावर कंटाळा करणाऱ्यांपैकी दीपिका नाही. याचाच प्रत्यय येत आहे ते म्हणजे सोशल मीडियावरील एका व्हिडिओमधून. ज्यामध्ये दीपिका 'बॅटल रोप्स वर्कआऊट' हा व्यायामप्रकार करताना दिसत आहे. नाव ऐकायला कितीही सोपं असलं तरीही हा व्यायामप्रकार फारसा सोपा नाही. 

ताकदीची क्षमता आणि योग्य पद्धतीचा अवलंब करत केल्या जाणाऱ्या या व्यायाम प्रकाराच्या वेळी मात्र दीपिकाने तिचाच खास अंदाज दाखवत ट्रेनर अर्थात प्रशिक्षकालाही थक्कच केलं. सहसा जीममध्ये व्यायाम करतेवेळी गाणी सुरुच असतात. यादरम्यानच दीपिकाचा व्यायाम सुरु असतेवेळी तेथे 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटातील 'लुंगी डान्स' हे अतिशय प्रचंड गाणं वाजू लागलं. हे गाणं वाजत असतानाच दीपिकाही स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिने थेट य़ा गाण्यावर धमाल डान्स सुरु केला. 

वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

यास्मिन कराचीवालानेच इन्स्टाग्रामवर दीपिकाचा हा अफलातून व्हिडिओ शेअर केला आहे. 'मेहनत घेण्यासोबतच मजा, मस्ती करण्याचा सुरेख मेळ दीपिकाने साधला आहे....', असं लिहित सकाळी सहा वाजताचा व्यायाम सार्थ ठरतो, हा मुद्दा व्हि़डिओच्या कॅप्शनमधून यास्मिनने अधोरेखित केला.